करदात्यांना मोठा दिलासा, निर्मला सितारमण यांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली | करदात्यांना दिलासा देणार निर्णय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी घेतला आहे. मुख्य प्राप्तिकर आयुक्तांसह त्यांच्या समकक्ष सर्व कार्यालये या महिन्यात शनिवारी सुद्धा उघडी राहतील, अशी माहिती आहे.

पाहता प्रत्येक शनिवार आणि रविवार हा प्राप्तिकर खात्यासाठी सुट्टीचा दिवस असतो. मात्र आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी करदात्यांच्या समस्या आणि तक्रारी दूर करण्यासाठी ही सुट्टी रद्द करुन कार्यालये सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्राप्तिकर खात्याने करदात्यांना परतावा स्वरुपात दिलेल्या रक्कमेची आकडेवारी समोर आणली आहे. त्यानुसार, या आर्थिक वर्षात आतापर्यंत 2.14 कोटी करदात्यांना 1.86 लाख कोटी रुपये परतावा देण्यात आला आहे.

यामध्ये 2020-21 मध्ये 35,296.86 कोटी रुपयांसाठी 1.74 कोटींचा परताव्याचा ही सहभाग आहे. प्राप्तिकर खात्याने याविषयी ट्विट केलं आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 1 एप्रिल 2021 ते 7 मार्च 2022 या दरम्यान 2.14 कोटींहून अधिक करदात्यांना 1,86,677 कोटी रुपये परत केल्याची माहिती ट्विटमध्ये देण्यात आली आहे.

2,11,76,025 प्रकरणात 67,442 कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा देण्यात आला तर 2,31,654 प्रकरणात कॉर्पोरेट कर परतावा देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलेत.

दरम्यान, करदात्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राप्तिकर खात्याने (Income Tax Department) सक्रियपणे आणि सक्षमपणे समोर यावे यासाठी (Finance Minister) निर्मला सितारमण यांनी तंबी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आई हिराबेन यांची भेट; जेवतानाचे फोटो व्हायरल 

Russia-Ukraine War | पुतिन यांनी 70 वर्षांचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला 

मुंबईतल्या जोडप्याचा खुल्लम-खुल्ला रोमान्स; स्टेशनवर KISS करतानाचा व्हिडीओ तूफान व्हायरल 

“…तर उद्याच राजीनामा देतो, मला मंत्रिपदाने फरक पडत नाही” 

“मला असा संशय येतो की पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे”