मुंबई | आज बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पादुकोण आज 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेले अनेक वर्ष केलेल्या मेहनतीमुळे बॉलिवूडमध्ये दीपिकानं स्वतः एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज दीपिका ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहोचणं इतकं सोपं नव्हतं. कारण तिच्या कुटुंबाचा बॉलिवूडशी काहीही संबंध नव्हता. अशा परिस्थितीत दीपिकासमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते स्वत: ला सिद्ध करण्याचं आणि तिनं ते करुन दाखवलं. मात्र अनेक वेळा दीपिका विवादात सापडली आहे.
काही वर्षांपूर्वी दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ दीपिकाने महिलांबद्दल शेअर केला होता.
लग्नाआधी सेक्स ही महिलेची चॉईस आहे’. दीपिकाच्या या वाक्याने खळबळ माजली होती. अभिनेत्रीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. तिच्या या व्हिडिओला कडाडून विरोध करण्यात आला होता. यावरून नेटकऱ्यांनी दीपिकाला चांगलंच सुनावलं होतं.
दीपिका पादुकोणने यावर म्हटलं होतं. ‘लग्न आणि त्याच्याशी संबंधित सर्व प्रथा पवित्र असल्याचं म्हटलं होत. तसेच माझा उद्देश आपल्या होणाऱ्या जोडीदाराला दगा देणं किंवा त्याच्याशी चुकीचं वागणं हा मुळीच नव्हतां. असं म्हणत तिने या वादावर आपलं स्पष्टीकरण दिलं होतं.
दरम्यान, दीपिका पादुकोणचा जन्म कोपनहेगन, डेन्मार्कमध्ये झाला होता. तिचं बालपण बेंगलोरमध्ये गेलं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मोठी मुलगी आहे. ती आपल्या कुटुंबाच्या फारच जवळ आहे.
दीपिकानं तिच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. आज दीपिका चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त फी आकारणारी अभिनेत्री ठरली आहे. तिचा जन्म 5 जानेवारी 1986 ला झाला. दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहेत. दीपिकासुद्धा एक प्रोफेशनल बॅडमिंटनपटू आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रात आज लॅाकडाऊन होणार?, मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता
हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवता होती- उद्धव ठाकरे
उपेक्षितांसाठी सिंधुताईंचं काम खूप मोठं, त्यांच्या निधनामुळे दु:ख झालं- नरेंद्र मोदी
‘कोरोनाची तिसरी लाट आली तर…’, आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिला गंभीर इशारा
महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! राज्याची आकडेवारी 18 हजाराच्या पार