MPSC EXAM: वयाची मुदत संपणाऱ्या परीक्षार्थींना 1 वर्ष वाढवून देण्याचा मंत्री उदय सामंतांचा शब्द

मुंबई |  लॉकडाऊन आणि कोरोनामुळे महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकण्यात आली आहे. त्यामुळे आता यंदाच्या वर्षी ज्यांच्या वयाची मुदत संपणार आहे, त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं आहे. मात्र त्यांना 1 वर्ष वाढवून देण्याचा शब्द उ्च्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

यंदाच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आहे. त्यांना जर 1 वर्ष वाढवून दिलं नाही तर त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. म्हणून मी त्यांना 1 वर्ष वाढवून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांच्याशी बोलून निर्णय घेणार आहे, असं ते म्हणाले आहेत.

विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी परीक्षा देता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता यावी यासाठी त्यांची वयोमर्यादा 1 वर्ष वाढवून देणं आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करेल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उदय सामंत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत 1 वर्ष वाढ करण्याचा निर्णय झाल्यास हा मोठा दिलासा असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“वाटलं होतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सर्वांना समान न्याय भेटेल पण…”

-“शिधावाटपाच काम विनातक्रार व्हावं यासाठी पालकमंत्र्यांनी जातीनं लक्ष घाला”

-“रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या”

-म्हणून… ससूनच्या निवासी डाॅक्टरांनी दिला सामूहिक राजीनाम्याचा इशारा

-सगळा देश एकजुटीने लढत आहे, मात्र काही जण धर्माच्या नावाने धंदा करतायत- इरफान पठाण