तज्ज्ञ म्हणाले,’Omicron ची एकदा नाहीतर इतक्या वेळा लागण होऊ शकते’

नवी दिल्ली | ओमिक्रॉनची (omicron ) एकदाच नव्हे, तर दोनदा लागण होऊ शकते, असा दावा अमेरिकेचे एपिडेमिओलॉजिस्ट इरिक फिगल-डिंग यांनी केला आहे.

जर तुम्हाला ओमिक्रॉनचा संसर्ग कमी प्रमाणात झाला असेल आणि तुमची रोकप्रतिकारक शक्ती (Immunity system) उत्तेजित झालेली नसेल किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर काळजी घेणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

कोरोनाची पुन्हा लागण होण्याबद्दल वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. इतर तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंतच्या डेटावरून हेच लक्षात आलं आहे की एकदा लागण झाल्यानंतर दुसऱ्यांदा लागण होण्यापासून संरक्षण होऊ शकेलच असं नाही, असंही ते म्हणाले.

WHO च्या माहितीनुसार, ओमिक्रॉन हा भिन्न प्रकारचा व्हरिएंट असून, त्याचे म्युटेशन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्या स्पाइक प्रोटिनमध्ये 26 -32 म्युटेशन होत आहे. याच कारणामुळे ओमायक्रॉन हा व्हायरस अधिक संसर्गजन्य आहे.

लोकं ओमायक्रॉन व्हायरसशी इतके मिळतेजुळते झाले आहेत की, इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणे बाधेची तीव्रता जास्त असेल, तर त्याच्यापुढे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा काहीच काम करू शकत नाही, असा इशारा एम. डी. संसर्गजन्य रोगतज्ज्ञ आणि व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक विलियम शॅफनर यांनी दिला आहे.

दरम्यान, देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासात 2 लाख 68 हजार 833 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय.

गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 4631 कोरोना रुग्ण वाढले आहेत. दिवसभरात 1 लाख 22 हजार 684 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ओमिक्रनच्या रुग्णसंख्येनं 6041 चा टप्पा गाठलाय.

देशात 14 लाख 17 हजार 820 सक्रिय रुग्ण आहेत. देशाचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 16.66 वर गेला आहे. तर, देशात काल दिवसभरात 402 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 43 हजार 211 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

काळजी घ्या! कोरोना रूग्णसंख्येत वाढ सुरूच, वाचा आजची ताजी आकडेवारी 

सत्ता येताच बाळासाहेबांचा फोटो काढला अन् नारायण राणेंचा लावला; वादाला फुटलं तोंड

कोरोनाला दूर ठेवायचंय! व्यायामाचे ‘हे’ 5 प्रकार घरच्या घरी करा

“…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

 ‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया