नवी दिल्ली | दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी बातमी असणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.
या पदांसाठी (ESIC भर्ती 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (ESIC भर्ती 2022) आजपासून म्हणजेच 15 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे.
या रिक्त पदांद्वारे एकूण 3847 पदांची भरती केली जाणार आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) पदाच्या 1726 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. स्टेनोग्राफर पदाच्या 163 जागा, मल्टी टास्किंग स्टाफच्या 1931 जागा भरण्यात येणार आहेत.
अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवारांना रिक्त जागांचा तपशील तपासता येऊ शकणार आहे. ही भरती देशातील विविध राज्यांमध्ये केली जाणार आहे. ज्याची संपूर्ण माहिती वेबसाइटवर उपलब्ध नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) अंतर्गत ‘अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)’ पदाच्या महाराष्ट्रातील एकूण रिक्त जागा 594 आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट भेट देऊन स्वतःची नोंदणी करा. त्यानंतर अर्ज भरा आणि सेव्ह करा. तुमचा फॉर्म वॅलिडेट करा, सेव्ह करुन नेक्स्ट बटण दाबा. यानंतर, अर्ज शुल्क भरा. कागदपत्र स्कॅन करा आणि अपलोड करा.
महत्त्वाच्या बातम्या –
तज्ज्ञ म्हणाले,’Omicron ची एकदा नाहीतर इतक्या वेळा लागण होऊ शकते’
काळजी घ्या! कोरोना रूग्णसंख्येत वाढ सुरूच, वाचा आजची ताजी आकडेवारी
सत्ता येताच बाळासाहेबांचा फोटो काढला अन् नारायण राणेंचा लावला; वादाला फुटलं तोंड
कोरोनाला दूर ठेवायचंय! व्यायामाचे ‘हे’ 5 प्रकार घरच्या घरी करा
“…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य