दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर!

मुंबई | विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 10 जूनपूर्वी दहावी ( SSC Exam Result ) आणि बारावीचा ( HSC Exam Result ) निकाल लावणार असल्याचा विश्वास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे.

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु होऊन 4 एप्रिल 2022 रोजी संपली आहे. आता दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांकडे पाठवण्यात आलेल्या होत्या.

आपल्या मागण्यासाठी उत्तर पत्रिका तपासणार नाही, असा बहिष्कार राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना टाकल्यानंतर दहावी-बारावीचा निकाल रखडणार असल्याचे सर्वत्र चर्चा होती.

दोन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही परिक्षांचे निकाल जाहीर होतील. विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिका न तपासण्याची भूमिका घेतली असली तरी, अनुदानित शाळांमध्ये राखीव शिक्षकांच्या मदतीने पेपर तपासणीचे काम पूर्ण केले जाणार आहे, असं शिक्षण मंडळ पुण्याचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं.

यंदा दहावीच्या परीक्षेत 16 लाख 40 हजार तर बारावीच्या परीक्षेत 14 लाख 87 हजार विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली आहे.

दरम्यान, 10 जूनपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल लावणार असल्याचा विश्वास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

IPL 2022: सलग 5व्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला आणखी एक झटका, आता रोहित शर्माला… 

‘नितीनजी, RSSचं हॉस्पिटल फक्त हिंदूंसाठीच आहे का?’; टाटांच्या प्रश्नावर गडकरी म्हणाले…

पालकानो काळजी घ्या! लहान मुलांमध्ये होतोय कोरोनाचा प्रसार

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची खुशखबर; अर्थ मंत्रालयाने केली मोठी घोषणा

“…आता शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी”