मुंबई | ज्या व्यक्तींना कोरोनाचा ( Corona) संसर्ग दीर्घ काळ झाला होता, त्यांच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम झाले असून, त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.
स्पेन युनिव्हर्सिटीमधल्या (Spain University) जर्मन ट्रायस आय पुंजोल हॉस्पिटलच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनाचं वृत्त hindustannewshubने दिलं आहे. ज्यांचा कोरोना संसर्ग खूप काळ टिकला होता, त्यांच्या व्हेगस नर्व्हच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि काम करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे हृदयाच्या ठोक्यांवरही (Heart Beat) त्याचा परिणाम होऊ शकतो.
व्हेगस नर्व्ह आपल्या हृदयाचे ठोके आणि बोलण्याची क्षमता निर्धारित करते. मेंदूपासून संपूर्ण शरीरापर्यंत जाणारी व्हेगस नर्व्ह हृदय, फुफ्फुसं आणि आतड्यांपर्यंत जाते. अन्न गिळताना घशाच्या स्नायूंवरही व्हेगस नर्व्हचं नियंत्रण असतं. यासोबतच हृदयाचे ठोके, बोलण्याची क्षमता, घाम येणं आणि शरीराच्या इतर हालचालींवर या नर्व्हचं नियंत्रण असतं.
ज्या रुग्णांना दीर्घ काळ कोरोनाची लागण झालेली असेल, अशा रुग्णांना बोलण्यास त्रास होणं, अन्न गिळण्यास त्रास होणं, चक्कर येणं, हृदयाचे ठोके असामान्य होणं अशी लक्षणं दिसू शकतात, असं संशोधक डॉ. जेम्मा लाडोस यांनी म्हटलं आहे.
या संशोधनात समोर आलेल्या परिणामांमुळे दीर्घ काळापासून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना भेडसावणाऱ्या इतर समस्या समजून घेण्यास मदत होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू
“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय”
युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा
“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”
“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा