Bappi Lahiri | ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन!

मुंबई | ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचं निधन झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलंय. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

1980 च्या दशकात आपल्या संगीत आणि गाण्यांद्वारे लोकांची मने जिंकणाऱ्या बप्पी लाहिरी यांनी डिस्को डान्सर, शराबी आणि नमक हलाल यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये गाणी गायली.

बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. ते बंगाली ब्राह्मण कुटुंबातील होते. बप्पी लाहिरी हे अशा गायकांपैकी एक आहेत ज्यांनी भारताला डिस्कोची ओळख करून दिली.

वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लाहिरी हे मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. बप्पी लाहिरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात.

बप्पी लाहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लाहिरी आणि त्यांची मुलगी – गायिका रेमा लाहिरी बन्सल असा परिवार आहे. 2020 मध्ये एप्रिल महिन्यात बप्पी लाहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र रुग्णालयात काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती.

महत्वाच्या बातम्या-   

काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू

“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय” 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”