मुंबई | नाराज असलेल्या भाजपच्या फायरब्रँड नेत्या पंकजा मुंडे यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू केले आहेत. पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टवरून आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली होती. माजी मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना फोन केला असल्याचं समजतंय.
पंकजा मुंडेंची नाराजी ही देवेंद्र फडणवीसांविरुद्ध असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे त्या बंडाचा झेंडा तर उभारणार नाहीत ना याबद्दलही अंदाज व्यक्त केले जात होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनीच पंकजा मुंडे यांना फोन करून चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे.
सर्व कार्यकर्त्यांना 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहनही केलं होतं. त्यामुळे त्या दिवशी पंकजा मुंडे या मोठी घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्याने आधीच भाजपला धक्का बसलाय. त्यातच पंकजा मुंडे नाराज असल्याने त्यांची नाराजी ही पक्षाला परवडणारी नाहीये. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता खुद्द देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत.
पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टचा विरोधकांनी चुकीचा अर्थ काढला जात आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली आहे. तर शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत यांनी पंकजा मुंडे याच नाही तर भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
डोंबिवलीकरांसाठी सुप्रिया सुळेंनी संसदेत केली ‘ही’ मागणी – https://t.co/UfM2vbjRwS @supriya_sule @NCPspeaks @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
“देवा आम्हाला नव्या भारतातील अशा नवशिक्या अर्थशास्त्रज्ञांपासून वाचव”-https://t.co/DXXdFOClpa @PChidambaram_IN @INCIndia @BJP4India @RahulGandhi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
सलमान, ….तर तुझा दबंग 3 चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही- अभिजीत बिचुकले – https://t.co/2cegxkFdaP @BeingSalmanKhan @AbhijitAwadeB #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019