PM आणि CM यांच्यातील वाकयुद्धात फडणवीसांनी उडी; ट्विट करत म्हणाले…

मुंबई | देशातील मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. अशातच आता पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली.

कोरोनाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी काही राज्यांना वाढत्या दरवाढीवरून सुनावलं आहे. त्यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्राला देखील दर कमी करण्याबाबत सुनावलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.

संपूर्ण देशात महाराष्ट्रातून सर्वात जास्त 15 टक्के जीएसटी गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी एकत्र केल्यास महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. तरीही महाराष्ट्राला सुमारे 26 हजार 500 कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणं बाकी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकल्याचं पहायला मिळालं आहे. दोषारोप आणि जबाबदारी झटकणं, यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का?, असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेऊन बसलात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू होतं, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाकी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै 2022 मिळणार, मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का?, असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

शेजारच्या दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळतं, तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का? याचं उत्तर मिळालंच पाहिजे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला आणि मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या, अशी मागणी देखील फडणवीसांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सोमय्यांची जखम खरी की खोटी?, डाॅक्टरांचा अहवाल आला अन् स्पष्टच झालं…

 “…तर सोमय्यांची हत्याच झाली असती”; भाजप नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

 अनिल देशमुखांची जेलमधून सुटका होणार?; महत्त्वाची माहिती समोर

रक्त की टोमॅटो सॉस?; सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर 

“मी स्वप्नवत नेता आहे, मी काम केलं नाही तर लोक मारतील”