“आपलं नसेल जमत ते सोडून द्या, पण उद्धवजी एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल”

मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सरकारला घेरलं आहे.

राज्य सरकार अधिकारी आणि सरकारी वकीलांना हाताशी धरून भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

फडणवीस यांच्या आरोपानंतर राज्यात मोठा वाद उद्भवला आहे. अशातच भाजपतर्फे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे.

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप ठेवत सक्तवसूली संचनालयानं नवाब मलिक यांना अटक केली आहे. पण राज्य सरकारनं त्यांचा राजीनामा घेतला नाही.

मलिक यांच्या राजीनाम्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. आझाद मैदानावरील सभेत फडणवीसांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

आपलं नसेल जमत ते सोडून द्या, उद्धवजी एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल. मुंबईचे चिथडे चिथडे उडवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा तुम्ही काय केलं, असं बाळासाहेब विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल, असा सवाल ठाकरेंना केला आहे.

आम्ही तर सांगू की बाळासाहेब आम्ही तर संघर्ष केला पण तुमचेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. सत्तेसाठी आंधळे झाले होते परिणामी राजीनामा घेवू शकले नाहीत, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्यात मोठा संघर्ष सुरू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’ 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी! 

“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या” 

पुन्हा सत्तेत आल्यास योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, जाणून घ्या सविस्तर