राज ठाकरेंची पहिल्यांदाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर सडकून टीका, म्हणाले…

मुंबई |  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) 16 वा वर्धापन दिन सोहळा पुण्यात पार पडला. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणावर घणाघाती टीका केली आहे.

राज्यात काय चाललंय, मला काहीही कळत नाही. राजकारणी विचार न करता मत मांडतात, असं म्हणत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकांना राजकारणाचा वीट आलाय, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

ते परवा आमचे राज्यपाल बोलले, काही समज आहे का?  मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा शेकहँड घेतला तेव्हा असं वाटलं की, हात बघून इथं मंगळ आहे, तिथं बुध आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांनी राज्यपालांची नक्कल देखील केली आहे.

कुडमुडे ज्योतिषी असतात ना तसे राज्यपाल आहे, अशी टीका देखील राज ठाकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडी आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं.

बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. आमच्याच लोकांना महापुरुषांना बदनाम करायचं, युवकांची माथी भडकवायची असले उद्योग सुरु असल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. एसटी कामगारांच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही, असंही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

“आपलं नसेल जमत ते सोडून द्या, पण उद्धवजी एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल”

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’ 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी! 

“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या”