सदावर्ते निघाले अयोध्येला! अयोध्येतील साधु-संतांनी आमंत्रण दिल्याचा दावा

मुंबई | राज्यासह देशात सध्या हनुमान चालीसा, अयोध्या, भोंगे यावरून जोरदार राडा चालू आहे. अशातच राज्यातील विविध नेते अयोध्या दौरा जाहीर करत आहेत.

राज्यातील प्रमुख नेते अयोध्या दौरा जाहीर करत आहेत म्हटल्यावर आता प्रसिद्ध वकील सदावर्तेंनी देखील अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे.

दोन दिवसांपू्र्वीच सदावर्तेंनी एसटी कष्टकरी जनसंघ नावानं संघटना काढली आहे. एसटी कामगारांच्या प्रश्नावर सरकारशी सहमती न झाल्यानं सदावर्तेंनी संघटनेची घोषणा केली.

संघटनेच्या माधम्यातून कामगारांची प्रश्न सोडवण्याचा निर्धार सदावर्तेंनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आत सदावर्तेंनी आपल्याला अयोध्येतील साधु-संतांनी बोलावलं असल्याचं सांगितलं आहे.

राम जन्मभूमीच्या केसमध्ये आपण वकील होतो त्यामुळं आपल्याला अयोध्येतून बोलावणं आलं आहे, असं देखील वकील सदावर्ते म्हणाले आहेत.

जय श्रीराम आणि जय भीम म्हणणारे आता कुणालाही घाबरत नाहीत. बॅंकेची निवडणुक लढवणार म्हटल्यावर पायाखालची वाळू सरकल्याचं सदावर्तेंनी म्हटलं आहे.

अयोध्येत आमचं साधु-संत स्वागत करणार आहेत. डंके की चोट पर यापुढं आम्ही सरकारला उत्तर देऊ. आमचे हक्का सरकार असे पायदळी तुडवू शकत नाही, असं देखील सदावर्ते म्हणाले आहेत.

दरम्यान, सदावर्तेंच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर आता राज्यात मोठा वाद उद्भवला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील सदावर्तेंवर जोरदार टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “घोटाळेबाजांवर आता अंतिम कारवाई”; सोमय्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

 “राज साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”

सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; राजद्रोहाचं कलम तूर्तास स्थगित 

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; सोनं-चांदी झालं स्वस्त, वाचा ताजे दर 

“सुदैव आहे तुमचं की तुम्हाला तुरूंगात दणके बसले नाहीत, तुम्ही त्यातच खुशी माना”