मोठी बातमी! शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचं निधन

मुंबई | शिवसेनेचे अंधेरी पुर्वचे आमदार रमेश लटके यांचं ह्रद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनेला हा मोठा धक्का बसला आहे.

अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे लटके हे शिवसेनेचे मातब्बर नेते मानले जात होते. त्यांनी अंधेरी पुर्वमधून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता.

नगरसेवक पदापासून आपली राजकीय कारकिर्द सुरू करणारे लटके हे 1997, 2002, 2009 मध्ये मुंबई महापालिकेचे सदस्य नगरसेवक राहीलेले आहेत.

भाजप उमेदवार सुनिल यादव यांचा पराभव करून लटकेंनी पहिल्यांदा 2014 मध्ये विधानसभेत प्रवेश केला होता. अंधेरी भागातील नागरिक लटकेंवर प्रचंड विश्वास दाखवत होते.

आमदार लटके आपल्या परिवारासह दुबईला गेले असता त्या ठिकाणी ह्रद्यविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं आहे. सध्या त्यांचं पार्थिव मुंबईत आणण्याची प्रक्रिया चालू आहे.

राजकीय पक्षांच्या पलिकडं जाऊन लटकेंचे विविध पक्षातील नेत्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. अजातशत्रु म्हणून देखील ते राजकारणात वावरत होते.

दरम्यान, अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या सोईची काम करण्यासाठी लटके प्रयत्नशिल होते. अशात त्यांच्या जाण्यानं शिवसेनेचं मोठं नुकसान झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 सदावर्ते निघाले अयोध्येला! अयोध्येतील साधु-संतांनी आमंत्रण दिल्याचा दावा

 “घोटाळेबाजांवर आता अंतिम कारवाई”; सोमय्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

 “राज साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”

सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; राजद्रोहाचं कलम तूर्तास स्थगित 

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; सोनं-चांदी झालं स्वस्त, वाचा ताजे दर