शेतकरी राजा संतापला! चुकीच्या भूसंपादनाविरोधात उद्या धडक मोर्चा

शिरूर | शासनाने चासकमानचे पुनर्वसन करण्यासाठी शिरूर तालुक्यातील शेत जमिनींचे आव्वाच्या सव्वा संपादन आणि वाटप केलं. नियमबाह्य जाऊन, चुकीच्या धोरणामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या माथी चुकीचा स्लॅब मारून  जमिनी हडप केल्या, असा आरोप शेतकऱ्यांनी पुनर्वसन आणि भूसंपादन आधिकाऱ्यांवर केला आहे.

चुकीच्या भूसंपादनाविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांकडून उद्या सकाळी 11 वाजता धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे.

आपल्या पुढच्या पिढीला उरली सुरलेली शेतजमीन शिल्लक ठेवण्यासाठी एकत्रित लढा द्यायची हीच ती वेळ आहे. त्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहा, असं आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे.

दरम्यान, जिल्हााधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेने वाटप केलेल्या जमीनीमध्ये गैरप्रकार झाल्याचा तक्रारी विभागीय आयुक्तांकडे आल्या होत्या. त्यानंतर आयुक्तांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले होते.

महत्वाच्या बातम्या-