जिल्हा परिषदेतही ‘आम्हीच नंबर 1’; फडणवीसांनी सादर केली आकडेवारी!

मुंबई | महाविकास आघाडीने जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर प्रभाव दाखवला आहे. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात त्या नागपूर जिल्हा परिषदेत भाजपचा सपशेल पराभव झाला आहे. मात्र तरीही भाजपच एक नंबरचा पक्ष, असं भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

सहा जिल्ह्यांच्या पंचायत समितींच्या 194 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या 106 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. त्यामुळे आम्हीच नंबर 1 असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदनही केलं आहे.

नागपूर, धुळे, नंदूरबार, अकोल, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदांचे पंचायत समितींचे निकाल बुधवारी जाहीर झाले. त्यानुसार भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला आहे.

दरम्यान, धुळे जिल्हा वगळता इतर पाचही जिल्हा परिषदांमध्ये भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. महाविकास आघाडीने उर्वरीत 4 जिल्ह्यांमध्ये तर अकोला जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाने वर्चस्व मिळवलं आहे.

 


महत्वाच्या  बातम्या-