जनता कर्फ्यूच्या दिवशी राजू शेट्टींनी काय केल? पहा व्हिडीओ

कोल्हापूर |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूला देशभरात तसंच राज्यात मोठा प्रतिसाद मिळतोय. माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही या जनता कर्फ्यूला आपला पाठिंबा दर्शवला आहे. आज दिवसभर त्यांनी शेतातल्या शिवारात गुराढोरांच्या सानिध्यात आपला दिवस घालवणं पसंत केलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करू नये. आपल्या घरात बसावं. कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. राजू शेट्टी यांनी आपल्या धकाधकीच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातून वेळ काढत आजच्या कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवत आपल्या शिवारात थांबणं पसंत केलं.

राजू शेट्टी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते गाईला धुण्याचं काम करत असताना दिसून येत आहे. त्यांच्याबरोबर त्यांचा एक सहकारी देखील त्यांना गाई धुण्याच्या कामात मदत करताना दिसून येत आहे.

दरम्यान, देशभरात तसंच महारष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. महाारष्ट्रात ही संख्या 75 वर पोहचली आहे. त्यामुळे राज्य शासनाने मोठी पावलं उचलली आहेत. संपूर्ण महारष्ट्रात आज रात्री 12 वाजल्यापासून कलम 144 लावण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. तसंच रेल्वे, बस आणि लोकल देखील बंद करण्याचा निर्णस शासनाने घेतल आहे.

 

 

 

महत्वाच्या बातम्या – 

-खासदारांनो दिल्लीला जाऊ नका, महाराष्ट्रातच थांबा आणि सरकारी यंत्रणांना कोरोना विरोधात लढण्यास मदत करा – शरद पवार

-“संपूर्ण बॉलिवूडने कनिका कपूरवर बहिष्कार टाकावा”

-करोनाबाधित 75 शहरं लॉकडाऊन करा; मोदी सरकारचे राज्यांना आदेश

-महाराष्ट्र लॉकडाऊन मात्र… ‘या’ गोष्टींची दुकाने चालू राहणार!

-“आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्रात कलम 144 लागू “