रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, आता…

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन यांच्यात आता प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली आहे. दणकट अशा रशियासमोर युक्रेन आपल्या पुर्ण ताकदीनिशी लढताना दिसत आहे.

रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीवजवळ पोहचल्याचं समजतंय. येत्या काही तासांमध्ये रशियन फौजा कीववर ताबा मिळवू शकतात. त्यामुळे आता राजधानी पडल्यावर रशिया अधिक आक्रमक होऊ शकते.

युक्रेन आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीने आगामी काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत. अमेरिकेने दिरंगाई केल्याने युक्रेन आता या लढाईत एकाकी पडल्याचं चित्र आहे.

अशातच आता अनेक भारतीय नागरिक देखील युक्रेनमध्ये अडकले आहे. युक्रेनने आपलं हवाई क्षेत्र बंद केल्याने आता अनेक भारतीय युक्रेनमध्येच अडकले आहेत.

या नागरिकांना परत आणण्यासाठी इतर काही मार्गांचा विचार केला जातो आहे. काही ठिकाणी विमानसेवा सुरू असली तरी किंमती अनेकपटींने वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता भारतीय पालक चिंतेत आहे.

अशातच आता अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एअरलिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती आहे. युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी मोदी सरकार काही विमानांची व्यवस्था करणार आहे. या विमान प्रवासाचा खर्च सरकार उचलणार असल्याची माहिती समोर आलीये.

दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची अधिक माहिती घेऊन काही सुचना देखील दिल्या आहेत. त्यामुळे अडलेल्या नागरिकांना वाचवण्यास मदत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Russia-Ukraine War: “मी देश सोडला नाही, आता आम्ही एकटे पडलोय…”

BIG BREAKING: नवाब मलिक यांची तब्येत बिघडली, मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल

लेकीला छातीशी कवटाळून धायमोकलून रडला; युक्रेनमधील बाप-लेकीचा व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी! नवाब मलिकांनंतर शिवसेेनेचा ‘हा’ नेता तपास यंत्रणांच्या रडारवर 

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…