मोठी बातमी! महेश मांजरेकरांना न्यायालयाचा झटका

मुंबई | मागील काही दिवसांपासून मराठी चित्रपटांचा ट्रेंड बदलताना दिसत आहे. परिवारिक आणि प्रेमकथेपेक्षा आता वास्तविक आणि वैचारिक चित्रपटांकडे मराठी दिग्दर्शकांचा कल झुकलेला पहायला मिळतो.

अनेक थक्क करणारे आणि प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारे सिनेमे अनेकदा पहायला मिळतात. मात्र, चित्रपटाच्या काही चित्रिकरणामुळे अनेकदा वाद झाल्याचं पहायला मिळतो.

अशातच आता अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्यावरून हा मुद्दा पेटला होता. माहिम पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ देखील झाली होती.

त्यानंतर महेश मांजरेकर यांनी गुन्हा रद्द व्हावा यासाठी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायलयाने त्यांना अटकेपासून कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

या प्रकरणात न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्याची माहिती देखील मिळाली आहे. चित्रपटात मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, अनेक आता महेश मांजरेकरांना दिलासा मिळणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

महत्वाच्या बातम्या –

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, आता…

Russia-Ukraine War: “मी देश सोडला नाही, आता आम्ही एकटे पडलोय…”

BIG BREAKING: नवाब मलिक यांची तब्येत बिघडली, मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल

लेकीला छातीशी कवटाळून धायमोकलून रडला; युक्रेनमधील बाप-लेकीचा व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी! नवाब मलिकांनंतर शिवसेेनेचा ‘हा’ नेता तपास यंत्रणांच्या रडारवर