“इंदोरीकरांवर 15 दिवसांत गुन्हा दाखल करा, नाहीतर…”

अहमदनगर |  सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात केलं होतं. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांवर 15 दिवसात गुन्हा दाखल करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना या प्रकरणी अंनिसने नोटीस बजावली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी या प्रकरणी तपास करण्यात कसूर केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. तसंच या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी कारवाई केली नाही तर कोर्टात जाणार असल्याचाही इशारा अंनिसने दिला आहे.

निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदोरीकरांविरोधात असणारे पुरावे जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर केले आहेत.

दरम्यान, पुराव्याअभावी इंदोरीकर महाराजांना क्लीनचीट मिळण्याची शक्यता होती, मात्र अंनिसनं या प्रकरणात लक्ष घातलं असून या प्रकरणाचे व्हिडीओ शोधून काढले आहेत. आता हेच व्हिडीओ जिल्हा शल्य चिकीत्सकांना देण्यात आले असून १५ दिवसांत इंदोरीकरांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी ठाकरे सरकार उद्या जाहीर करणार

-खासदार सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअ‌प स्टेटसला फडणवीसांचा फोटो अन् कॅप्शनमध्ये म्हणाल्या…

-‘उद्धव ठाकरेंना लाज वाटत होती काय?’; नारायण राणेंचं टीकास्त्र

-इंदोरीकरांचा ‘तो’ व्हीडिओ अंनिसच्या हाती; महाराजांच्या अडचणीत वाढ!

-अमृता फडणवीसांना तोंड आवरायला सांगा; शिवसेना नेत्याचं संघाला पत्र