शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी ठाकरे सरकार उद्या जाहीर करणार

मुंबई |  शुक्रवारी शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी उद्या जाहीर होणार आहे. याआधी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात 15 हजार 358 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी घोषित करण्यात आली आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. ठाकरे सरकारने घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी सोमवारी २४ फेब्रुवारीला जाहीर केली आहे.

आता दुसरी यादी २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे कर्जमाफीसाठी निवडण्यात आली आहेत. याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, हे पाहून कर्जमाफीची पुढील यादी प्रसिद्ध होती.

मात्र, मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे

महत्त्वाच्या बातम्या-

खासदार सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअ‌प स्टेटसला फडणवीसांचा फोटो अन् कॅप्शनमध्ये म्हणाल्या…

-‘उद्धव ठाकरेंना लाज वाटत होती काय?’; नारायण राणेंचं टीकास्त्र

-इंदोरीकरांचा ‘तो’ व्हीडिओ अंनिसच्या हाती; महाराजांच्या अडचणीत वाढ!

-अमृता फडणवीसांना तोंड आवरायला सांगा; शिवसेना नेत्याचं संघाला पत्र

-‘उद्धवच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं’; भाजपची बोचरी टीका