अखेर अमिताभ बच्चन यांनी आपल्या पहिल्या प्रेमाबाबत सोडलं मौन, म्हणाले…

मुंबई | बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांचे आज जगभरात लाखो चाहते आहेत. गेली कित्येक वर्षे अमिताभ बच्चन यांनी एकाहून एक सुपरहिट चित्रपट देत जनतेचं मनोरंजन केलं आहे. बिग बी आपल्या व्यावसायिक आयुष्यबरोबरच वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे देखील नेहमीच चर्चेत असतात.

बिग बींच्या तारुण्यात त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या खूप चर्चा चालल्या. अनेक बड्या अभिनेत्रींसोबत अमिताभ यांचं नाव जोडलं गेलं. तसेच त्यांची काही प्रेमप्रकरणं देखील भरपूर गाजली.

अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या प्रेमाविषयी तर अनेकदा चर्चा चालत असतात. बिग बींचं पाहिलं प्रेम नक्की कोण? असा सवाल अनेकदा केला जातो. अशातच आता बिग बी यांनी स्वतः ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर पहिल्या प्रेमाचा उल्लेख केला आहे.

केबीसीच्या एका भागात पुण्यातील दिप्ती तुपे उपस्थित होत्या. दिप्ती तुपे यांना केबीसीमध्ये मोठ्या रकमेचं बक्षीस जिंकता आलं नाही. परंतु तुपे यांच्या उत्तम खेळीमुळे आणि स्वभावामुळे त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं.

दिप्ती यांच्या आयुष्यातील संघर्ष दाखवण्यासाठी आणि त्यांची ओळख करून देण्यासाठी केबीसीमध्ये एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये दिप्ती जगण्याचा मनमुरादपणे आनंद घेताना दिसल्या. तसेच त्या सायकल देखील चालवताना दिसल्या.

दिप्ती यांचा जगण्याचा हटके अंदाज पाहून बिग बी देखील प्रभावित झाले. व्हिडीओ संपल्यानंतर दिप्ती यांनी अमिताभ यांना एक प्रश्न विचारला. पिकू सिनेमासाठी तुम्ही सायकल चालवायला शिकलात की थेट सायकल चालवली? असा सवाल दिप्ती यांनी अमिताभ यांना केला.

त्यावर उत्तर देताना अमिताभ बच्चन म्हणाले की, माणूस जिवनात काही गोष्टी केव्हाच विसरू शकत नाही. जसं की पोहणे, सायकल चालवणे आणि पाहिलं प्रेम. दरम्यान, पाहिलं प्रेम हा शब्द उच्चारण्यापूर्वी अमिताभ यांनी थोडा वेळ घेतला.

महत्वाच्या बातम्या-

पैसाही गेला अन् लेकही दुरावली, रानू मंडल पुन्हा रस्त्यावर!

…अन् त्या माऊलीने आपल्या मुलासाठी गरोदरपणात कापला पाय, वाचा सविस्तर

प्रेमासाठी ‘या’ राजकुमारीनं सोडली राजगादी, सर्वत्र होतंय कौतुक

हटके अंदाजात पवनदीपने केलं अरुणिताला प्रपोज, व्हिडीओ होतोय व्हायरल

“नौटंकी सिद्धार्थसाठी तरी तू नाटक करणं बंद कर!”