पैसाही गेला अन् लेकही दुरावली, रानू मंडल पुन्हा रस्त्यावर!

मुंबई | रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या गाण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर त्यांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली होती. रानू मंडल व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या सुंदर आवाजाची दखल प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाँ यांनी घेतली आणि रानू मंडल यांचं ‘तेरी मेरी कहाणी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं.

रानू मंडल यांचं गाणं रिलीज झाल्यानंतर माध्यमांनी देखील त्यांना डोक्यावर चढवलं. मात्र, हे यश त्यांना जपून ठेवता आलं नाही. प्रसिद्धी मिळताच रानू मंडल यांनी चाहत्यांशी आणि माध्यमांशी उद्धटपणे वागणं चालू केलं. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली.

अशातच आता रानू मंडल यांचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रानू मंडल कारच्या समोर माईक पकडून गाणं गाताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये रानू मंडल यांनी त्यांचा जुनाच वेश परिधान केल्याचं दिसत आहे. रानू यांना वाऱ्यावर सोडलेल्या त्यांच्या मुलीने त्या प्रसिद्धीच्या पायऱ्या चढत असताना पुन्हा जवळ केलं होतं. मात्र, आता रानू यांची आर्थिक परिस्थिती ढासल्याने त्यांच्या मुलीने पुन्हा रानू यांना वाऱ्यावर सोडलं आहे.

दरम्यान, रानू यांना पुन्हा पहिल्या वेशात पाहून नेटकरी ‘जैसी करणी वैसी भरणी’ अशा प्रतिक्रिया देत आहेत. तर काही लोक रानूबरोबर जे काही घडतंय ते एकदम योग्य असल्याचं म्हणत आहेत.

काही दिवसांपूर्वीच रानू यांचा चाहत्यांशी उद्धटपणे वागतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये रानू यांची एक चाहती सेल्फीसाठी आल्यानंतर त्या तिला ‘डोन्ट टच मी आय अम सेलेब्रिटी नाऊ’ असं म्हणताना दिसल्या होत्या. या व्हिडिओनंतर रानू त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती.

महत्वाच्या बातम्या-

…अन् त्या माऊलीने आपल्या मुलासाठी गरोदरपणात कापला पाय, वाचा सविस्तर

प्रेमासाठी ‘या’ राजकुमारीनं सोडली राजगादी, सर्वत्र होतंय कौतुक

हटके अंदाजात पवनदीपने केलं अरुणिताला प्रपोज, व्हिडीओ होतोय व्हायरल

“नौटंकी सिद्धार्थसाठी तरी तू नाटक करणं बंद कर!”

अंकिताच्या घरी देखील गौरीचं आगमन, पाहा खास व्हिडीओ