मुंबई | राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे संचालक परमबीर सिंग यांना अखेर पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आलं आहे.
परमबीर सिंग यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या वसुली प्रकरणात त्यांना अनेक वेळा समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, सिंग काही हजर राहिले नाही. त्यामुळे मुंबईच्या किल्ला कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केले होते.
अखेर गेल्या आठवड्यात त्यांनी कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये डीसीपी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी परमबीर सिंग यांची चौकशी केली.
गेल्या काही महिन्यांपासून सिंग हे ड्युटीवर नव्हते. शिवाय खात्यातीलच सहकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यामुळे अखेर त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
दरम्यान, फरारी घोषित करण्याचा आदेश रद्द करण्यासाठी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी सुधीर भाजीपाले यांच्या कोर्टासमोर आज सुनावणी झाली. मात्र पुढील सुनावणी उद्या ठेवण्यात आली आहे.
सिंग यांना संरक्षण देण्यात आलं आहे. तसेच ते तपास अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करणार असल्याचंही कोर्टाने नमूद केलं आहे. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आल्याचा आदेश रद्द करण्यात यावा, असा युक्तिवाद सिंग यांची वकील अरबी मोकाशी यांनी केला आहे.
सह आयुक्त विनय सिंह यांना फरार घोषित करण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. त्याचा अहवाल अजून आला नसल्याचं सांगत या प्रकरणी उद्या सुनावणी ठेवण्याची विनंती विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी केलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“…त्यावेळी ईडी कार्यालयात जाण्याचा सल्ला मीच शरद पवारांना दिला होता”
मंत्री नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…
“कंगनाच्या स्वागतापेक्षा ममतांचं स्वागत नक्कीच चांगलं”
‘पुढील 2 आठवडे भारतासाठी खूप महत्वाचे’; Omicron बाबत तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती
प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला स्पष्टच सांगितलं, ‘तुमचा 10 वर्षात 90 टक्के पराभव झालाय त्यामुळे…’