Top news देश

शेतकऱ्यांपुढे मोदी सरकार नमलं; आंदोलकांना दिली ‘ही’ परवानगी!

नवी दिल्ली |  कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणा मधील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे देशातील वातावरण चांगलंच चिघळलं आहे. पंजाब आणि हरियाणातून आलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत प्रवेश मिळाला आहे. या आंदोलनात जवळपास 5 लाख आंदोलकांचा सहभाग असल्याचं शेतकरी संघटना सांगत आहेत.

पंजाब आणि हरियाणा मधून निघालेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन करत मोदी सरकारची कान उघडणी केल्याशिवाय आपण माघार घेणार नसल्याचा पवित्रा उचलला होता. आंदोलकांनी दिल्लीतील जंतर मंतर किंवा रामलीला मैदानात आंदोलन करू देण्याची परवानगी मागितली होती.

मात्र, प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या बुऱ्हाडी येथे असणाऱ्या निरंकारी मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाने केवळ निरंकारी मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. या मैदानाच्या बाहेर आंदोलकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

शुक्रवारी आंदोलक आणि पोलीस यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. शुक्रवारी या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सिंघू सीमेवर पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांकडून देखील अश्रूधारा आणि वॉटर कॅनॉनचा वापर करण्यात आला होता.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनात फार मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले आहेत. ही संख्या पाहता पोलिसांनी सरकारकडे 9 स्टेडीअमला तुरुंगात परावर्तीत करण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर बोलताना केंद्र कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हटले की, मोदी सरकारने 3 तारखेला शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं आहे. तसेच विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील नागरिकांना एकत्र जमण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, आंदोलनातील शेतकरी महिनाभर पुरेल अशी सामग्री घेऊन आंदोलनात उतरले आहेत.

परंतु आंदोलनातील शेतकऱ्यांनी आपण कोरोनाच्या सर्व गाईड लाईन्सचं पुरेपूर पालन करू, असं आश्वासन दिलं आहे. तसेच आंदोलनातील सर्व शेतकरी मास्क वापरत सोशल डिस्टंन्सिंगचं देखील पालन करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

गाडी घ्यायचा विचार करताय?; भारताच्या ‘या’ सर्वात सुरक्षित गाड्या नक्की पाहा!

कंगनाचं ट्वीटर अकाउंट निलंबित होणार? मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

‘या’ दोन रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा सर्वात कमी धोका!

धक्कादायक! एम्सच्या डॉक्टरांना कोरोना रुग्णांमध्ये आढळली ‘ही’ दोन नवी लक्षणं!

एकनाथ खडसेंच्या आरोपानंतर 1100 कोटींच्या ‘त्या’ घोटाळ्यावर गिरीश महाजन म्हणाले…