मुंबई | सध्या धका-धकीच्या जीवनशैलीत आपल्याला स्वत:ला आपण वेळ देत नाही. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. वाढते प्रदुषणामुळे आपली त्वचाही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.
प्रत्येकाला आपली त्वचा तजेलदार, टवटवीत हवी असते. विशेषत: चेहऱ्यावर अनेकांना पुरळ येणे, सुरकुत्या येणे, इत्यादी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या सगळ्या समस्यांंवर आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.
जर तुमच्या चेहऱ्यावर सुरुकत्या असतील, तर तुम्ही बीटच्या रसामध्ये मध आणि दूध टाका. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोन ते तीनवेळा लावा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरुकुत्यांचे प्रमाण हळूहळू कमी होईल.
बीटचा रस उच्च रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त ठरतो. संशोधकांना असे अढळून आले आहे की, जे लोक दररोज एक कप बीटाच्या रसाचे सेवन करतात सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी असतो. बीटच्या रसामध्ये नायट्रेट असते, ते रक्तप्रवाह सुरळीत करते. ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.
बीटाच्या रसात साखर घालून ओठांवर स्क्रब केल्याने, ओठांवरील काळ्या त्वचेचा थर निघून जातो. ओठ गुलाबी होण्यास मदत होते.
जर तुम्हाला तुमची त्वचा गुलाबी हवी असेल, तर एक बीट किसून घ्या. किसलेले बीट ते चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने लावून घ्या. 15 मिनिट तसेच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा आणि मान धुवून टाका. ही प्रक्रिया दररोज केली तर तुमच्या चेहऱ्यावर एक गुलाबी चमक दिसू लागेल.
तुमच्या डोळ्याखाली काळं झालं असेल. तर बीटाचा रस, मध आणि दूध याचं मिश्रण एकत्र करा. त्यानंतर कापसाच्या सहाय्याने हे मिश्रण डोळ्यांना लावा आणि नंतर काही वेळानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
तसेच गर्भवती महिलांमध्ये फोलेटच्या कमतरतेमुळे अकाली प्रस्तुती होण्याची शक्यता असते. परंतू बीटाच्या रसाचे सेवन केल्याने शरिरातील फोलेटची मात्रा वाढण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या-
आयकर विभागाच्या छापेमारीनंतर तापसी पन्नूची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली….
मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पाठवणीवेळी खूप रडणं नवरीला पडलं महागात, घडली ‘ही’ ध.क्कादायक घटना
सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा काय आहेत आजचे दर
“केंद्राची जबाबदारी नाकारुन भाजपने दिशाभूल करु नये”