बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. यामध्ये तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना,विकास बहल यांच्या घरी छापेमारी आयकराने सकाळी छापेमारी केली आहे.
आयकर विभागाने 3 मार्च रोजी म्हणजेच बुधवारी टॅक्स चोरी प्रकरणात निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर छापे टाकले. असं म्हटलं जातय फॅन्टम फिल्म कंपनीच्या कथित कर चुकवेगिरी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. अशातच आयकर विभागानं छापे टाकल्यानंतर 3 दिवसांनी आज अभिनेत्री तापसी पन्नूने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री तापसीनं ट्विट करुन आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तापसीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटंले आहे की, 3 दिवसांच्या शोधात फक्त तीन गोष्टींचा समावेश आहे. पहिल्या ट्विटमध्ये तिनं म्हटलं की, पॅरिसमधील ज्या कथित बंगल्याची चावी माझ्याकडे असल्याचे बोलले जात आहे, ज्याची मी स्वतः मालकीण आहे. तिथे मी कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलेले नाही.
दुसऱ्या ट्विटमध्ये तापसीनं म्हटलं की, पाच कोटींची पावती मिळाल्याच्या आरोपावर तापसीने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, पाच कोटींची कोणतीच रिसिप्ट तिच्याकडे नाही आणि नाही तिने असे कोणते पैसे घेतले आहेत.
शेवटच्या तिसऱ्या पोस्टमध्ये ती म्हणाली की, 2013 मधील कोणत्याच छापेमारीशी तिचा संबंध आहे. तिने लिहिले की, अर्थमंत्री यांच्यानुसार, 2013 ला माझ्या येथे छापे टाकले होते. आता स्वस्त कॉपी नाही. असे म्हणत तापसीने कंगनावर निशाणा साधला कारण कंगना राणौतने तिला बऱ्याचदा स्वस्त कॉपी असे संबोधले आहे.
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्याची निगडित असलेल्या एकूण 28 मालमत्तांवर छापेमारी केल्यानंतर आयकर विभागाला त्यांच्या आर्थिक व्यवहरात काही विसंगती आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सांगितले होते की 2013 मध्येही त्याच व्यक्तींवर छापे टाकण्यात आले होते, परंतु त्यावेळी या गोष्टीची काहीच चर्चा झाली नाही. सध्याच्या परिस्थितीत हा खुप मोठा चर्चेचा विषय बनला आहे. राजकीय नेत्यांनी, सेलेब्रिटींनी, राहुल गांधी आणि शिवसेनेने सुध्दा या छाप्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती.
महत्वाच्या बातम्या –
मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पाठवणीवेळी खूप रडणं नवरीला पडलं महागात, घडली ‘ही’ ध.क्कादायक घटना
सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा काय आहेत आजचे दर
“केंद्राची जबाबदारी नाकारुन भाजपने दिशाभूल करु नये”
महत्वाचा दुवा समजला जाणाऱ्या ‘या’ उड्डाणपुलाला शरद पवारांचं नाव द्या; राष्ट्रवादीची मागणी