जाणून घ्या! डाळिंब खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

मुंबई |  अनेक लोकांना फलाहार करायची फार सवय असते. तर आज आपण अशाच एक फळाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर आज आपण डाळिंबामध्ये कोणकोणते घटक असतात. त्याचा आपल्या शरीराला कशाप्रकारे फायदा होतो. यासर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत.

डाळिंबाचे फळ जितके बाहेरून दिसायला सुंदर असते, तितकेच ते आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते.  डाळिंब खाल्ल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

डाळिंबाचे फायदे-

  1. डाळिंबाच्या सेवनाने तुमच्या रक्तातातील ऑक्सिजनची मात्रा सुधारते. शरीरातील सर्व भागांमधील रक्त प्रवाह सुरळीत होतो. डाळिंबामध्ये अँटि-ऑक्सिडेंट असल्यामुळे ते फ्री रॅडिकल्सशी लढते.
  2. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये डाळिंबाचा समावेश केला पाहिजे. हे फळ खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही.
  3. डाळिंबामध्ये अँटि-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत, जे आपल्या तोंडात प्लाक जमण्यापासून रोखतात. तोंडात जळजळ होत असेल, तर डाळिंबाचे सेवन केल्याने जळजळ थांबते.
  4. त्याचप्रमाणे हिरड्यांचा विकार आणि पीरियोडोंटायटिपासून देखील आपला बचाव करतो.
  5. डाळिंबामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते आणि त्याचबरोबर कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
  6. डाळिंब हे आपल्या त्वचेसाठीही खूप गुणकारी आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, मुरुम किंवा पुरळ असतील, तर डाळिंबाचे सेवन केल्याने ते कमी होण्यास मदत होते. तसेच तुमच्या चेहऱ्यावरील तेजही वाढते.
  7. चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करायचा असल्यास डाळिंब खाणे सर्वात उपायकारक आहे.
  8. डाळिंबाचे साल आणि दूधाचे पेस्ट तयार करून ते चेहऱ्याला लावल्यावर चेहऱ्यावर काही दिवसांनी ग्लो यायला सुरुवात होते. आठवड्यातून दोनदा ही पेस्ट चेहऱ्याला लावली, तर तुम्हाला तुमची त्वचा चमदारा आणि तजेलदार झालेली पाहायला मिळेल.

महत्वाच्या बातम्या-

पुणे हा.दरलं! अल्पवयीन मुलीवर सामूहिक ब.लात्कार करुन छातीत…

‘…तर आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करु’;…

“अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही…

खळबळजनक! पुण्यात भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाचा गोळी लागून…

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निर्बंधांचे पालन होत…