जाणून घ्या! उन्हाळ्यात दही खाण्याचे ‘हे’ फायदे

मुंबई |   हिवाळा ऋतू संपला असून आता उन्हाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता वाढू लागल्याचं जाणवू लागलं आहे. उन्हाळा म्हटलं की बऱ्याच जणांची तोंडं लगेचं वाकडी होतात. कारण उन्हाळ्यात जास्त बाहेर पडता येत नाही. त्याचबरोबर बाहेर फिरायला गेलं की लगेचच त्वचा काळवंडने, टॅनिंग होणे ह्या समस्या सुरु होतात.

त्याचप्रमाणे उन्हाळ्यात अनेकांना थंडगार काही तरी खाण्याची फार सवय असते. परंतू नेहमी वेगवेगळं तरी काय खायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच काही लोकांना जेवण करताना दही खायची फार सवय असते. या दह्याचे आपल्या आरोग्यासाठी कोण-कोणते फायदे होतात. हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दही खाण्याचे फायदे-

  1.  उन्हाळ्यात बऱ्याचवेळा आपल्याला पोटाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी दहीचे सेवन केल्याने त्यावर चांगला उपाय ठरतो. दही आपलं पचनतंत्र मजबूत करण्यास मदत करते. दही हे एक चांगला बॅक्टेरिया आहे, जो पचन तंत्रातील अडथळा दूर करतो.
  2. उन्हाळ्यात दही खाल्याने आपली त्वचाही चमकदार आणि तवटवीत राहण्यात मदत होते. दह्यामध्ये लॅक्टीक अॅसिड असते. त्यामुळे त्वचेचे संरक्षण होते. चेहरा काळवंडला असेल तर, त्यावर दह्यामध्ये लिंबाचा रस घाला आणि त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. काहीवेळानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.
  3. त्याचप्रमाणे केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठीही दही हे उपयुक्त मानले जाते.
  4. दह्याचे दररोज सेवन केल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधीत असलेल्या आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे.
  5. दह्यामध्ये दूधापेक्षा पोषक घटक अधिक असतात. तसेच दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात.

महत्वाच्या बातम्या-

OnePlus 9 आणि Oneplus 9 Pro जबरदस्त कॅमेरासह बाजारात, जाणून…

“तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार…

आज सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा…

‘काम हवं असेल तर……’ अंकिता लोखंडेचा…

मोठी बातमी! बीड जिल्ह्यात ‘इतके’ दिवस लॉकडाऊन…