‘या’ तीन अभिनेत्रींना किस करण्यास इम्रान हाश्मीने दिला नकार, कारण…

मुंबई |  आपल्या समोर बॉलिवूड अभिनेता इम्रान खानचे नाव येताच आपल्याला त्याच्या किसचे सीन आठवतात. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिलेले आहेत. त्यामुळे त्याची ओळख आपल्याला एक सिरीयल किसर म्हणून आहे.

परंतू वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई आणि द डर्टी पिक्चर या सिनेमांमधून इम्रान हाश्मीची अभिनयाची दूसरी बाजू पाहायला मिळाली. आज 24 मार्च रोजी इम्रानचा वाढदिवस आहे. त्याच्या जन्म दिनानिमित्त आपण त्यांची आणखी एक महत्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत.

इम्रान हाश्मीने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीबरोबर सिनेमात काम केलं आहे. त्या सिनेमात त्यांनी खूपदा किसिंग सीनही दिले आहेत. मात्र बॉलिवूड तीन अभिनेत्रीसोबत कधीही किसिंग सीन देणार नसल्याचं त्यांनी एकदा सांगितलं होतं.

त्या तीन अभिनेत्रींमध्ये महेश भट यांची मुलगी आलिया भट हिचे नाव आहे. यामागे दिग्दर्शक महेश भट कारण आहेत. इम्रान आणि महेश भट यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. त्याने महेश यांच्या अनेक सिनेमात काम देखील केलं आहे. त्यामुळे इम्रान महेश भट यांचा कायम आदर करत असल्यानं आलियाला तो आपली बहिण मानतो. त्यामुळे किसिंग सीन करणे, योग्य नसल्याचं म्हणत, त्याने आलियासोबत किसिंग सीन करण्यास नकार दिला आहे.

त्यानंतर आपल्या बोलण्याने सर्वांना गार करणारी बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगणा रणावतसोबत देखील कधीच किसिंग सीन करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कंगणा बऱ्याच वेळा आपल्या सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य करत असते, कलाकारांवर आ,रोप करत असते.

बऱ्याच कलाकारांबरोबर तिचे जमतही नाही. त्या यादीमध्ये इम्रान हाश्मी याचेही नाव येते. काही कारणावरुन इम्रान आणि कंगणामध्ये वाद झाले होते. त्यामुळे कंगणासोबत किसिंग सीन करणार नसल्याचं त्यांने सांगितलं होतं.

त्यामध्ये जरीन खानसोबतही किसिंग सीन देणार नसल्याचं त्यांंन सांगितलं होतं. कारण जरीन आणि इम्रान हे दोघं जागले मित्र आहेत. त्यामुळे तिच्यासोबत किसिंग सीन देणे त्याला योग्य वाटतं नसल्याचं इम्रानने सांगितलं.

दरम्यान, अलिकडेच इम्रान हाश्मीने वेबविश्वात पदार्पण केलं आहे. त्याची पहिली वेबसिरीज ‘बार्ड ऑफ बल्ड’ ही होती.  तर नुकताच त्याचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटाचं नाव ‘मुंबई सागा’ आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! उन्हाळ्यात दही खाण्याचे ‘हे’ फायदे

OnePlus 9 आणि Oneplus 9 Pro जबरदस्त कॅमेरासह बाजारात, जाणून…

“तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार…

आज सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा…

‘काम हवं असेल तर……’ अंकिता लोखंडेचा…