जाणून घ्या! कच्च्या हळदीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकजण आपल्या सौंदर्याविषयी नेहमी चिंतेत राहतो. आपली सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी मुली पार्लरमध्ये जाताना दिसतात. ब्युटी पार्लर एक अशी जागा आहे जिथे मुली ब्युटी ट्रिटमेंट करुन रिलॅक्स आणि सुंदर होऊन बाहेर पडतात. मात्र, याचे उलटे परिणामही पहायला मिळतात.

काही मुली सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रकारटे ब्यूटी प्रोडक्ट वापरतात. परंतू त्यातील काहींना ते प्रोडक्टस सूट होत नाही आणि त्यांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका गोष्टीच नाव सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या समस्या कायमच्या बंद होण्यास मदत होईल.

कच्ची हळद म्हणजेच ओली हळद आपल्या शरिरासाठी खुप फायदेशीर असते. पावडर पेक्षा कच्च्या हळद अधिक गुणकारी असते. आयुर्वेदात या हळदीचे अनेक गुणधर्म सांगण्यात आले आहेत.

सर्दीची समस्या दूर करण्यासाठी, पचन संस्था सुरळीत काम करण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, रक्ताचे शुद्धीकरण करण्यासाठी तसेच इतर बऱ्याच आजारांवर कच्ची हळद उपाय कारक असल्याचे सांगण्यात आले आहे.

कच्च्या हळदीचे फायदे-

  • शरिराचा एखादा भाग किंवा एखादा अवयव दुखत असल्यास कच्च्या हळदीचा लेप त्या भागावर लावल्यास काही वेळानंतर वेदना कमी होतात.
  •  गोठलेल्या रक्ताचा प्रवाह सुरुळीत होतो. यासाठी कच्ची हळद उगाळून कोमट करुन रक्त गोठलेल्या भागावर लावावी.
  •  तसेच शरिराच्या कोणत्याही भागावर गाठ आली असेल, तर कच्च्या हळदीचा लेप लावावा.
  • कच्ची हळद कधीही खाल्ली जात नाही. त्यामुळे तिचा उपयोग जास्त करुन बाह्यअंगावरच केला जातो.
  • चेहऱ्यावर फोड, पुरळ आल्या असतील, तर त्या भागावर कच्ची हळद उगाळून लावल्यास तो भाग उजळून निघतो.
  • त्वचा चमकादार आणि तजेलदार करण्यासाठी कच्च्या हाळदीची पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावायची. त्यानंतर काही वेळानंतर चोहरा हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा. ही प्रोसेस तुम्ही नियमित केली, तर तुम्हाला त्यांचे चांगले परिणाम पाहायला मिळतील.

महत्वाच्या बातम्या-

‘डोकी फु.टली तर रडत दिल्लीत जाऊ नका….’ संजय राऊत

‘राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त…’; नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल

आज सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा आजचे दर

छे.डछाड करणाऱ्या रोड रोमियोला विद्यार्थिनीने भररस्त्यात मा.रलं, पाहा व्हिडिओ

“विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा, तेल स्वस्त झालंय का?”