‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीये…..’ सचीन वाझेंच्या स्टेटसनं ख.ळबळ

मुंबई| पो.लिस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या मृ.त्यूप्रकरणात वाझेंचं नाव समोर आलं आहे. मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची ह.त्या केल्याचा आ.रोप केला आहे. अशात आज त्यांनी त्यांच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसला एक पोस्ट लिहिली आहे. सध्या ती पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसतेय.

मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांची एटीएसकडून 10 तास चौकशी झाली होती. उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या जवळ स्फो.टक सापडली होती. त्यानंतर या प्रकरणाचा मुख्य साक्षीदार मनसुख हिरेन यांचा सं.शयास्पद मुत्यू झाला. याप्रकरणात सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अर्ज केला होता. मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे याचा अंतिम जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला आहे. आता याप्रकरणात पुढील सुनावणी 19 तारखेला ठेवण्यात आलेली आहे.

3 मार्च 2004 साली सी.आयडीने मला एका खो.ट्या प्रकरणात अ.टक केली होती. मला केलेली ही अ.टक आतापर्यंत अ.योग्यच आहे. या इतिहासाची मला पुन्हा जाणीव करून देत आहे. माझे सहकारी आणि अधिकारी मला या प्रकरणात अ.डकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दा.वा वाझे यांनी त्यांच्या व्हाॅट्सअप स्टेटस मधून केला आहे.

गेली 17 वर्षे माझ्याकडे अपेक्षा, सहनशीलता, आयुष्य आणि नोकरीही होती. पण आता माझ्याकडे आयुष्याची 17 वर्षही नाहीत. ना नोकरी, ना जगण्याची आशा नाही, असं वाझे यांनी या स्टेटस मध्ये म्हटलं आहे. तर जगाचा नि.रोप घेण्याची वेळ जवळ येत आहे, असं वाझे म्हणाले आहेत.

मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे ख.ळबळ उडाली आहे.

सचिन वाझे हे गेल्यावर्षी तब्बल 16 वर्षांनी पो.लिस दलात परतले होते. एन्का.उंटर स्पे.शालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. क्रा.ईम ब्रँचच्या सीआययू युनिटचे एपीआय असणारे सचिन वाझे मुंबईत सापडलेल्या स्फो.टकांचा तपास करत होते. मात्र आता हा तपास सहायक पो.लिस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला. शुक्रवारी वाझेंची बदली देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आज वाझेंनी व्हॉट्सअॅपवर केलेल्या आ.रोपामुळे हे प्रकरण काय वळण घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणावरून विधानसभेत विरोधी पक्षाने आ.क्रमक पवित्रा घेतल्याने सरकारला सचिन वाझेंवर का.रवाई करत त्यांची बदली करावी लागली. नुकतीच त्यांची सी.बीडीमध्ये बदली करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘डोकी फु.टली तर रडत दिल्लीत जाऊ नका….’ संजय राऊत

‘राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त…’; नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल

आज सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा आजचे दर

छे.डछाड करणाऱ्या रोड रोमियोला विद्यार्थिनीने भररस्त्यात मा.रलं, पाहा व्हिडिओ“विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा, तेल स्वस्त झालंय का?”