जाणून घ्या! कोरोना काळात ‘या’ पेयांचे सेवन केल्याने वाढते रोगप्रतिकार शक्ती

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

हा विषाणू शरिरात गेल्यावर त्याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर होत आहे. त्यामुळे लोक आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागली आहे. योगासने, व्यायाम, नियमित आहार घेणे याकडे काळजी पूर्वक लक्ष देऊ लागले आहेत.

कोरोनाच्या या महामारीचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असणं खूप गरजेचं आहे. तर आज आम्ही तुम्हाला असे पेयांविषयी माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

 कैरीचे पन्हे- आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात आंब्याला जास्त डिमान्ड असते. आंबा हे उन्हाळ्यातील सर्वात आवडता फळ आहे.  या दिवसांत कैरीचे पन्हे  आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे पन्हे कैरी, जिरेपूड आणि मिठ यापासून तयार केले जाते. यामुळे डिहायड्रेशन आणि अतिसाराची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

वाळ्याचे सरबत- उन्हाळा ऋतूमध्ये तापमान अधिक असते. त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढते, त्याचबरोबर शरिरातील उष्णताही वाढते. अशादिवसांमध्ये वाळ्याचे  सरबत उपयाकारय ठरते. हे सरबत पिल्याने आपल्या शरिराला थंडावा जाणवतो. तसेच त्यामुळे शरिर हाड्रेटेडही राहण्यास मदत होते.

हे सरबत बनवणे खूप सोपे आहे. पाणी, वाळ्याचा इसेन्स (खस पल्प), साखर आणि हिरवा रंग एकत्र करून हे सरबत बनवले जाते. यामध्ये लोह, मँगनीज आणि व्हिटामिन बी 6, अँटीऑक्सिडंट्स यासारखे अनेक पोषक घटक असतात. ते आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असतात. तसेच त्या घटकांमुळे आपली रोगप्रतिकार शक्तीही वाढण्यास मदत होते.

पुदीना ताक- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना काहीतरी थंड खायची फार इच्छा होते. त्यावेळी आपण पुदीना ताक प्यायले पाहिजे. हे पेय आपल्या शरिराला थंडज ठेवण्याचे काम करते. पुदीना टाकामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहते. तसेच पुदीन्यामध्ये अँटीऑक्सिडेंट, व्हिटामिन सी, ई, ए भरपूर प्रमाणात असते आणि जिऱ्यामध्ये व्हिटामिन सी असते. हे दोन्ही घटक आपल्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे कार्य करतात.

महत्वाच्या बातम्या-

आता18 वर्षे पूर्ण वयाच्या लोकांना घेता येणार लस, रजिस्ट्रेशन…

…म्हणून पोलीस स्टेशनमध्येच उरकला महिला कॉन्स्टेबलचा…

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘ही’…

क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या बायकोचा ‘हा’…

जाणून घ्या! वॅक्सिनचे काही साईडइफेक्ट आहेत का?