आता18 वर्षे पूर्ण वयाच्या लोकांना घेता येणार लस, रजिस्ट्रेशन कसे करावे?, वाचा सविस्तर

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

कोरोना महाआजाराशी सामना करण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्यात वृद्धांना आणि फ्रन्ट लाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर 45 वर्षाच्या पुढच्या वयोगटातील लोकांना लस देण्यात आली होती.

आता सरकारने 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोनाप्रतिबंध लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं? त्यासाठी कोण-कोणते कागदपत्र अनिवार्य आहेत? यासगळ्याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • रजिस्ट्रेशन कसे होईल-

आरोग्य सेतु अ‍ॅप आणि कोविन पोर्टल (cowin.gov.in) वर रजिस्ट्रेशन करता येईल. त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर ओटीपीद्वारे व्हेरिफाय करावा लागेल. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा एखाद्या अन्य आयडीच्या आधारावर माहिती सबमिट करावी. त्यानंतर पिनकोड टाकून व्हॅक्सीनेशन साईट, तारीख आणि वेळ निवडावी लागेल. तसेच एका मोबाइल नंबरवरून केवळ 4 रजिस्ट्रेशन होऊ शकेल.

  •  कागदपत्राचे पर्याय-
    आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, हेल्थ इन्श्युरन्स स्मार्ट कार्ड, पेन्शन डॉक्युमेंट, बँक/पोस्ट ऑफिस पासबुक, एमपी/एमएलए/एमएलसी यांचे आयडी कार्ड, सरकारी कर्मचार्‍याचे सर्व्हिस आयडी कार्ड, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत जारी स्मार्ट कार्ड

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! वॅक्सिनचे काही साईडइफेक्ट आहेत का?

IPL 2021: अर्धशतक पूर्ण झाल्यावर विराटनं ‘या’…

डाॅक्टरला ऑक्सिजनसाठी रडताना पाहून ‘या’…

कोरोना काळात ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष,…

जाणून घ्या! कोरोना वॅक्सिन घेणे का गरजेचं आहे?