जाणून घ्या! कोरोनाची आणखी दोन नवीन लक्षणं

नवी दिल्ली |  गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. मागील काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

सगळीकडे आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच आता कोरोनाच्या लक्षाणांमध्ये आणखी नवीन दोन लक्षाणाची वाढ झाली आहे. आज आम्ही तुमम्हाला त्याचविषयी माहिती देणार आहोत.

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने दिलेल्या माहितीनूसार कोरोनाच्या अर्ध्याहून अधिक रूग्णांमध्ये काही अशी लक्षणे दिसून आली आहेत, जी याआधी आढळून आली नव्हती.

तोंड कोरडे पडणे हे यामधील प्रमुख लक्षण आहे. यालाच जेरोस्टोमिया असंही म्हटलं जातं. संसर्ग झाल्याच्या सुरूवातीला हे लक्षण दिसून येते. त्यानंतर रुग्णाला ताप आणि घसा दुखण्यासारखी लक्षणं दिसू लागतात.

तसेच एक रिपोर्टनूसार जीभ कोरडी पडणे हेही लक्षणं दिसून आलं आहे. हे लाळ न बनण्याचे कारण असू शकते. यादरम्यान जीभ कोरडी पडू शकते, जीभेवर पांढरे डाग दिसू शकतात. ज्या रुग्णांमध्ये हे लक्षण आढळून आलं, त्या रुग्णांना जेवताना त्रास होतो. त्याचप्रमाणे त्या रुग्णाला तोंडात लाळ तयार होत नसल्यानं जेवन निटसं चावताही येत नाही.

त्यामुळे अशी लक्षण असलेल्या रुग्णांना बोलण्यामध्येही प्रोब्लेम येऊ शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार शरिरामध्ये लाळ निर्माण करण्याची कमी होणे हे तोंड कोरडं पडण्याचं मुख्य कारण असते. लाळेमुळे आपले तोंड धो.कादायक विषाणू आणि अन्य हानिकारक घटकांपासून संरक्षण होत असते.

तज्ञांच्या मते जर सुरूवातीच्या काळात लक्षणांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवले, तर तपास आणि रुग्णांवर उपचार करण्यामध्ये खूप मदत मिळू शकते. त्यामुळे कोरोना वाढणारा प्रादुर्भाव आपल्याला रोखता येऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या-

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! आपल्या पिल्लांना…

‘वडिलांचा पैसा वाया घालवतेय’ म्हणणाऱ्या महिलेला…

मी स्वतः मरेन पण ‘याला’ मरु देणार नाही, पाहा…

IPL 2021: चेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर 6 विकेट्सने दणदणीत…

अखेर 15 दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर उतरले; वाचा आजचे इंधनाचे…