जाणून घ्या! कोरोना काळात डाळी खाण्याचे काय आहेत फायदे?

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

हा विषाणू शरिरात गेल्यावर त्याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर होत आहे. त्यामुळे लोक आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागली आहे. योगासने, व्यायाम, नियमित आहार घेणे याकडे काळजी पूर्वक लक्ष देऊ लागले आहेत.

सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. या काळात सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आपल्याला काहीवेळा हिरव्या पालेभाज्या मिळण्यास अवघड होते. सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट रूजुता दिवेकरने सांगितले की, याकाळात आपण पौष्टिक आहार घेण्यासाठी डाळींचा उपयोग आपल्या आहात करू शकता.

डाळींमध्ये लोह, जस्त, जीवनसत्वे, सेलेनियम आणि लाइझिनसारख्या आवश्यक अमीने अॅसिड असतात. ही सर्व अॅसिड्स पदार्थांमधील कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतात. तसेच डाळींचे सेवन केल्याने तुमची भूकही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

आता सध्या उन्हाळा ऋतु सरु आहे. बाहेर कडाक्याचे उन जाणवतं आहे आणि या ऋतुमध्ये आपल्या शरिराची एनर्जी लगेचंच डाऊन होते. त्यामुळे या दिवसांमध्ये मूग, मटकी आणि चवळीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला रूजुताने दिला आहे.

या दिवसामध्ये या डाळी पचनास हलक्या असतात. तसेच या डाळींमध्ये जीवनसत्वे आणि लोहयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या शरिरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात मदत होते.

केस गळणे, पीसीओडी, सूज येणे, ताणतणाव आणि झोप न येणे अशा समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी त्यांच्या दररोजच्या आहारात सोयाबिन आणि मसूराच्या डाळीचा समावेश केला पाहिजे. यांचे सेवन नित्यनेमाने केल्याने यामुळे आपली साखर पातळी देखील नियंत्रित राहते.

महत्वाच्या बातम्या-

oscars 2021: ‘या’ चित्रपटानं 2021 सालातील तीन…

‘गावरान मुंडे’नंतर आता ‘हे’ Rap Song…

कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्यांची सलमान खान अशाप्रकारे…

काय सांगता! चक्क पक्ष्यांनी करून दाखवला हवेत भन्नाट स्टंट,…

अंतराळातून पृथ्वी नेमकी कशी दिसते?, जाणून घेण्यासाठी पाहा…