जाणून घ्या! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज काय बदल झाले?

अलिकडे काही वर्षांमध्ये पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे वाहन चालवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते.

मात्र, तुर्तास तरी सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सलग 19 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

दररोज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान तेल कंपन्यांकडून इंधनांचे नवीन दर जारी केले जातात. आज देखील गुड रिटर्न्स वेबसाईटने हे दर जारी केले आहेत. यात कोणतेही बदल पाहायला मिळाले नाहीत.

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.63 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.33 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.25 रुपये इतका आहे.

दरम्यान, पेट्रोलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 60 टक्के कर आकारला जातो. तसेच डिझेलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 54 टक्के कर आकारला जातो. हे कर सरकारने कमी केल्यास पेट्रोल, डिझेलचे दर खाली येवू शकतात.

पेट्रोल दरवाढ हा एक राष्ट्रीय प्रश्नच बनला आहे. पेट्रोल दरवाढीवरुन नेटकरी नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. तसेच देशभरातून इंधनाचे दर कमी व्हावेत, अशी मागणी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या – 

रोज वेलची खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या! पुण्यात आज ‘इतके’ रुग्ण कोरोनाबाधित

शेवटच्या चार षटकांसाठी कर्णधार झाला अन् त्यानं गेलेला सामनाच…

जब्याच्या शालूनं लावली सोशल मीडियावर आग; ‘या’ गाण्यावरील अदा…

“…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आरोग्यमंत्री…

नागपूरात पोलिसांनी हटकल्यानं महिलेचा भररस्त्यात राडा,…