मुंबई : सोशल नेटवर्किंगवर व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात एखादी व्यक्ती सेलिब्रिटी झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. याच व्यक्तींच्या यादीमध्ये आता रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या नावाचा समावेश झाला आहे.
रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या रानू यांच्या मधूर आवाजातील गाण्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात त्यांना गाण्याची संधी दिली आहे.
रानू मंडल यांचा सु़डिओमध्ये गाणं रेकॉर्डींग करतानाचा व्हीडिओही व्हायरल झाला आहे. मात्र काही जणांनी या स्टुडिओमधील व्हीडिओची नक्कल करणारे व्हाडिओ शूट करुन ते सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. असाच एक व्हीडिओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या एका कॉमेडियनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगभरातून रानू मंडल यांचं कौतुक होत असताना या कॉमेडियनने मंडल यांच्या हवाभावांची नाकरात्मक पद्धतीने मांडणी करत हा व्हीडिओ शूट केला आहे. त्यामुळे फेसबुकवर अनेकांनी याबद्दल आक्षेप नोंदवला आहे.
…या लोकांची लायकी नाही; पंकजा मुंडेंचं अजित पवार, धनंजय मुंडेंवर टीकास्त्र https://t.co/jU1zZqgdol #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019
राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; या नेत्याचा पक्षाला रामराम https://t.co/pLEH64a2Qs #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019
साताऱ्यात भाजप कार्यकर्त्यांची शिवेंद्रराजे हटावची घोषणा- https://t.co/JwYTMWJBWS #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019