IPL 2022 Auction: लिलावात ‘या’ 5 खेळाडूंवर सर्वांची नजर, पाहा लिस्ट

नवी दिल्ली | जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएलला ओळखण्यात येतं. भारतीय क्रिकेट मंडळाकडून दरवर्षी आयपीएलचं आयोजन करण्यात येतं. पुढील महिन्यापासून आयपीएल 2022 सुरू होण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं यावर्षी दोन नव्या संघांचा समावेश स्पर्धेत केला आहे. परिणामी ही स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. जगातील दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

फेब्रुवारी महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. परिणामी या लिलावाकडं सध्या अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. कारण प्रत्येक खेळाडूला भल्या मोठ्या रक्कमेला खरेदी करण्यात येणार आहे.

सध्या करारबद्ध झालेल्या खेळाडूंमध्ये केएल राहुल 17 कोटी रूपयांसह सर्वात पुढं आहे. परिणामी केएल राहुलचा सर्वाधिक किंमत्तीचा रेकाॅर्ड हा लिलावात मोडला जाण्याची शक्यता आहे.

दहा संघ मालकांमध्ये लिलावाच्या दिवशी टी-ट्वेंटी क्रिकेटमधील आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाच खेळडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सनराईजर्स हैदराबादला आपल्या नेतृत्वात फायनलमध्ये नेणारा डेव्हीड वार्नर या लिलावात सर्वाधिक किंमत मिळवू शकतो. सध्या त्याला सुर देखील गवसलेला आहे.

मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू इशान किशन आणि दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी काॅक हे दोन खेळाडू देखील मोठी रक्कम मिळवण्याच्या शर्यतीत आहेत.

भारतीय संघाला मधल्या फळीत मजबूती देणारा दिल्ली संघाचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर सर्वाधिक रक्कम मिळवणारा खेळाडू ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रेयस आक्रमक फलंदाजीसोबतच कर्णधार देखील आहे.

भारतीय संघाचा सलमीवीर शिखर धवन हा लिलावात उतरणार असल्यानं त्याच्या खेळीवर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत. आयपीएलचा लिलाव हा खेळाडूंना मालामाल करणारे हे नक्की.

महत्त्वाच्या बातम्या – 

…अन् आमदार संदीप क्षीरसागर स्वत: झाडावर चढले!, वाचा नेमकं काय झालं

भारतात फिरू नका, बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत- जो बायडन

“हे सरकारी ऑफिस आहे, कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये” 

युवराज सिंग झाला बाबा, घरी छोट्या ‘युवराज’चं आगमन 

‘शरद पवार आहेत म्हणून…’; ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य