‘त्यावेळी सर्वकाही व्यवस्थित होतं पण…’; सुशांत प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी प्रथमच मौन सोडलं

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकारणानं संपूर्ण देशात खळबळ घातली होती. मुंबई आणि बिहार पोलिसांनंतर सीबीआय, एनसीबी आणि ईडी सारख्या देशातील उच्च दर्जाच्या एजन्सीजने याप्रकरणी शोध सुरू केला होता. सुशांत प्रकरणावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते.

या प्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील अनेक आरोप करण्यात आले आहेत. विरोधकांनी सतत या प्रकानावरून आदीत्य ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं. मात्र, आदित्य ठाकरे अद्याप याप्रकणावर काही बोलले नव्हते. पण एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी याप्रकणावर मौन सोडलं आहे.

गेल्या एका वर्षात तुमच्यावर विरोधकांनी अनेक आरोप केले, यावर तुमचं म्हणणं काय आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांना मुलाखती दरम्यान करण्यात आला. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हटले, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं जास्त योग्य असल्याचा मी विचार करतो. कामावर सर्व लक्ष केंद्रित असल्यानं त्याकडे मी लक्ष दिलंच नाही.

टीका करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे. महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करतेय म्हणूनच माझ्यावर वैयक्तिक आणि चुकीचे आरोप करण्यात आले, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हटले आहेत.

तसेच मुलाखती दरम्यान आदित्य ठाकरे यांना पुढे विचारण्यात आलं की, मुंबई पोलीस आणि बॉलिवूड या संपूर्ण वादाचं केंद्र ठरलं होतं. पोलीस आणि बॉलिवूडवर आरोप करण्याबरोबरच तुमचं देखील नाव यात जोडण्यात आलं, यावर तुम्हाला काय वाटतं?

या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हटले की, जेव्हा त्यांचं सरकार होतं. तेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे, असं त्यांना वाटत होतं. विमान भरून दिल्लीला कार्यक्रमांसाठी जात होते. त्यांच्यासाठी गाणी गात होते. त्यांच्याशी चांगले संबंधही होते. पण सरकार गेल्यापासून त्यांना मुंबई पोलीस वाईट वाटू लागले.

मुंबईचा उल्लेख पुढे ड्र.ग्ज सेंटर म्हणून देखील करण्यात आला. महाराष्ट्रातील सरकार बदलल्यानं त्यांच्या चष्म्याचा नंबरही बदलला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सध्या होणाऱ्या चांगल्या गोष्टींमुळे त्यांना वाईट वाटत आहे. म्हणूनच ते राज्य सरकारवर आरोप करत आहेत, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.

दरम्यान, सुशांत प्रकरणी गेल्या कित्येक महिन्यांपासून सीबीआय तपास करत आहे. अनेक दिवसांच्या तापसानंतर सीबीआयने सुशांत सिंह राजपुतनं आ.त्मह.त्या केल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, अद्याप सुशांतच्या आ.त्मह.त्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Whatsapp वरील डिलीट केलेले मेसेज वाचायचे आहेत? मग ही भन्नाट ट्रिक वापरा

लेकीने करीनाला ‘आँटी’ म्हणताच संतापलेला सैफ साराला म्हणाला…

महिंद्रा कंपनी लवकरंच बंद करणार नुकतीच लॉंच केलेली ‘6 सीटर SUV थार’? वाचा सविस्तर

कंगनाच्या भावाचा लग्नादरम्यानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहा व्हिडिओ

दुःखद बातमी! भाजपच्या ‘या’ महिला आमदाराचं नि.धन, राजकीय क्षेत्रात हळहळ