देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच! ‘या’ महिला आरोपीला दिली जाणार फाशी

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येतील तुरुगांत एका महिला आरोपीला फाशी देण्यात येणार असून त्यासाठी तुरुंग प्रशासनानं तयारी सुरु केली आहे.

उत्तर प्रदेशातील अमरोहामधील शबनम नावाच्या महिलेनं 2008 साली आपल्या प्रियकरासोबत आपल्या नात्यातल्या 7 जणांचा कुऱ्हाडीने खून केला होता. या प्रकरणात शबनमला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कुटुंबातील सगळेच प्रेमाच्या आड येत होते म्हणून शबनमने प्रियकर सलीमच्या मदतीने हा हत्येचा कट रचला होता. हा भयंकर गुन्हा लगेचच उघडकीला आला. त्यानंतर तिच्यावर खटला दाखल होऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

या घटनेनंतर दोघांनीही अटक करुन वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आलं. शबनमला बरेलीच्या तुरूंगात तर सलीमला आगऱ्याच्या तुरूंगात ठेवलेलं आहे. त्यानंतर अमरोहा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला शबनमने सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने शबमनच्या मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली होती.

त्यानंतर शबनमनं आणि सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. राष्ट्रपतींनीही तिचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. मथुरा जेलमध्ये तिला फाशी होईल. शबनमच्या फाशीची तारीख अद्याप ठरलेली नाही. पण मथुरेच्या कारागृहात तयारी सुरू झाली आहे.

शबनमचे वडिल शौकत अली हे शिक्षक होते. शबनम ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. मात्र शबनमनं आंधळ्या प्रेमातून 14 एप्रिल 2008 रोजी प्रियकर सलीमच्या मदतीनं आपल्याच घरातील सात लोकांची नुर्घण हत्या केली. यामध्ये तीनं तिच्या अवघ्या दहा महिन्यांच्या भाच्यालाही ठार केलं. या घटनेमुळं संपूर्ण देश हादरुन गेला होता. आता या घटनेला 13 वर्ष पूर्ण होतील. शबनमला 13 वर्षांनी तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

एक लग्न असंही! आरोपी महिलेनं न्यायाधिशासोबत बांधली लग्नगाठ

    IPLच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली!!! दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूवर लागली जबरदस्त बोली

      IPL 2021 Auction | पंजाबच्या संघाचं नाव बदललं? के.एल.राहूलचा खुलासा म्हणाला…..

        FB चा मोठा दणका; ‘या’ देशात फेसबुकने बातम्या पाहण्यास, शेअर करण्यास घातली बंदी !

          अबब…सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घट; वाचा आजचा दर