शत्रुत्वानंतर जगाला दिसणार भारत-पाक मैत्री; इतिहासात पहिल्यांदाच करणार एकत्रितपणे ‘हे’ काम

नवी दिल्ली | भारत आणि पाकिस्तान 1947 नंतर दोन स्वतंत्र राष्ट्रे म्हणून जगात उदयास आली. तेव्हापासून दोन्ही राष्ट्रांतील संबंध ताणले गेलेेले आहेत. परिणामी याचा परिणामी दोन्हींकडील नागरिकांवर होतो.

पाकिस्तान आणि भारतामध्ये धार्मिकतेच्या नावावर फाळणी झाली. पाकिस्तान देशानं मुस्लीम हा आपला धर्म म्हणून स्विकारला तर भारताने धर्मनिरपेक्ष धोरण स्विकारलं.

भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध चागले व्हावेत म्हणून भारत सरकारनं अनेकदा प्रयत्न केले. भारतात कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी पाकिस्तानसोबत मैत्री करण्याचा विचार केला जातो पण पाकिस्तान असा विचार करत असल्याचं दिसत नाही.

पाकिस्तान आणि भारतातील नागरिकांच्या धार्मिक भावना या एकमेकांच्या देशात जुळल्या आहेत. पाकिस्तानातील नागरिकांना भारतात धार्मिक विधींसाठी यावं लागतं.

भारतातील शिख समुदायाचं पवित्र स्थळ देखील पाकिस्तानच्या हद्दीत आहे. अशा परिस्थितीत पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये प्रवासी हवाई वाहतूक होणार आहे. पाकिस्तान एअरलाइन्स आणि एअर इंडिया यांच्या प्रयत्नाने हे शक्य होणार आहे.

जानेवारीच्या सुरुवातीला भारतीय यात्रेकरू विमानाने पाकिस्तानात पोहोचल्यानंतर 75 वर्षांमध्ये प्रथमच पाकिस्तानी पर्यटक देखील 29 जानेवारी रोजी विशेष पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाने भारतात येतील.

आतापर्यंत यात्रेकरू किंवा पर्यटक एकमेकांच्या देशात पायी किंवा समझौता एक्स्प्रेसने जातात. दोन शेजारी देशांमधील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पीआयए आणि एअर इंडिया यांच्यात एक करार झाला होता, असं नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि पाकिस्तान हिंदू परिषदेचे अध्यक्ष रमेश कुमार म्हणाले आहेत.

29 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान पाकिस्तानातून भारतात प्रवासी येतील. देशातील अजमेर शरीफ, मथुरा, आग्रा, हरिद्वार, दिल्लीतील दर्गाच्या दर्शनासाठी हे नागरिक जातील, असं कुमार म्हणाले आहेत.

भारतातील या यात्रेसाठी प्रत्येक पर्यटकाला प्रत्येकी एक लाखापेक्षा अधिक खर्च येणार आहे. परिणामी सध्या या पाकिस्तानवरून येणाऱ्या पर्यटकांची सर्वत्र चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या- 

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ भागात थंडीच्या लाटेची शक्यता

देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले “युतीमध्ये असताना…”

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

“मी राजकारणातील कुंभार, मडकं फुटलं की नवं तयार करतो, मी अनेक नेते तयार केलेत”

“अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत, त्यामुळेच आम्हाला…”