बॉलिवूडची मुन्नी ‘ब्रा’वरून ट्रोल! म्हणाली, “स्त्रियांना नेहमी स्कर्टची लांबी…”

मुंबई | बॉलिवूड मुन्नी म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या फॅशन आणि स्टाईलने प्रसिद्धी मिळवणारी मलायका पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

मलायकाही तिच्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. मलायका अरोरा फॅशनचे नवीन लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

मलायका अरोरालाही तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे अनेकदा ट्रोलचा सामना करावा लागतो. अशातच सततच्या होणाऱ्या ट्रोलिंगमुळे आता मलायका वैतागली असल्याचं दिसतंय.

बाॅलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने या बद्दल राग व्यक्त केला आहे. स्त्रियांना नेहमी तिच्या स्कर्टची लांबी किंवा तिच्या नेकलाइनच्या खोलीच्या आधारावर ठरवलं जातं, असं मलायका म्हणाली आहे.

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीचे आणि स्वतःच्या पद्धतीने कपडे घालण्याचा अधिकार आहे. कपड्याच्या आधारावर महिलांचा न्याय करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं मत मलायकाने व्यक्त केलं आहे.

मलायका अरोरा मागील आठवड्यात ब्रा घालण्यावरून ट्रोल झाली होती. त्यावरून मलायकाला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मलायला चांगलीच भडकल्याचं पहायला मिळालं.

मी मूर्ख नाही आणि मला चांगलं माहित आहे की तिच्यावर काय चांगलं दिसतं आणि काय वाईट दिसतं, असं म्हणत मलायकाने संताप व्यक्त केला आहे.

तुमचे काही विचार असतील तर ते माझ्यासाठी नाही. मी माझ्या पद्धतीने कपडे घालते आणि आयुष्य जगते. ना मी कोणाला सांगितलं आहे ना कोणी मला सांगू शकते, असंही ती म्हणाली.

दरम्यान, मला जे सोयीस्कर वाटतं त्यानुसार मी काय घालावं आणि काय घालू नये याचा निर्णय घेते, असंही ती यावेळी म्हणाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मी सचिन वाझेंना…”; चांदिवाल आयोगासमोर अनिल देशमुखांचा धक्कादायक खुलासा

 ‘घोटाळा झालाय, चौकशी करा’; अण्णा हजारे यांचं अमित शहांना पत्र

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

“मी राजकारणातील कुंभार, मडकं फुटलं की नवं तयार करतो, मी अनेक नेते तयार केलेत”

“अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत, त्यामुळेच आम्हाला…”