“शून्य संख्येनंतरच लॉकडाऊन उघडला जाईल हा विचार अशक्य”

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार लॉकडाऊन वाढवत आहे. मात्र कोरानाबाधितांच्या शून्य संख्येनंतरच लॉकडाऊन उघडला जाईल हा विचार अशक्य असल्याचं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी डॉ. रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन सह अन्य समस्यांवर भाष्य केलं.

आपल्याकडे लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी एकउत्तम मार्ग आहे. आरोग्य, जीवनावश्यक वस्तू आणि शिक्षण यासारख्या गोष्टींवर अनेक राज्यांनी उत्तम काम केलं आहे. पण मध्यम वर्ग आणि निम्न मध्यमवर्गातील ज्या लोकांकडे चांगल्या नोकऱ्या नसतील त्यांच्यासमोर मात्र मोठं आव्हान असणार आहे. कोरोनाकडे संकट म्हणन नाही तर संधी म्हणून पाहा, असं राजन यांनी म्हटलं आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत काही चुकीचं तर आहे. लोकांकडे नोकऱ्या नाहीत. ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे. निधीचंही असमान वितरण होत आहे. येत्या काळात आपल्याला संधीचंही समान वितरीत करणं आवश्यक आहे, असंही राजन यांनी सांगितलं.

दरम्यान, शक्तिहिन लोकांना शक्तिशाली नेता आवडतो. आपण विभागलेल्या समाजाच्या मदतीनं प्रगती करू शकत नाही. सद्यस्थितीत आरोग्य आणि नोकऱ्यांसाठी उत्तम व्यवस्था करणं आवश्यक असल्याचंही राजन यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ऋषी कपूर यांच्या अखेरच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी उडवली होती टीकेची झोड; पाहा काय होतं ‘ते’ ट्विट

-ऋषी कपूर यांचं जाणं माझ्यासाठी अत्यंत दुख:द- अक्षय कुमार

-तो गेलाय आणि मी उध्वस्त झालोय… महानायक अमिताभ बच्चन यांची आदरांजली

-अभिनेते ऋषी कपूर यांची मृत्यूशी झुंज अपयशी; मुंबईतल्या एच. एन. रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास

-चिनी टेस्ट किट्सची ऑर्डर रद्द; भारत सरकारचा मोठा निर्णय