लॉकडाऊन नंतर ‘या’ गोष्टीची मला चिंता वाटते- शरद पवार

मुंबई |  लॉकडाऊन तसंच कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर अनेक लोक बेरोजगार होतील, याची मला चिंता आहे. लॉकडाऊननंतर अनेल लोकांचं काम जाणार आहे. अनेकांना लॉकडाऊननंतर नोकरीवरून कामावरून काढण्यात येईल, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज चौथ्यांदा महाारष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकार करत असलेलं काम, उपायोजना, शेती, उद्योग तसंच आर्थिक संकट यांसह इतरही मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं.

कोरोनामुळे राज्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या 40 दिवसांपासून राज्यातील अनेक कारखाने, उद्योगधंदे तसंच व्यापार बंद आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. एकंदरित राज्याच्या महसूलात 1 लाख 40 हजार कोटींची तूट येईल, असा अंदाज आहे. याची कल्पना पंतप्रधानांना पत्र लिहून मी दिली आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

केंद्र आणि राज्याने एकत्रित बसून आर्थिक प्रश्नावर मार्ग काढण्यासंबंधी चर्चा केली पाहिजे. तसंच राज्याला वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक मदत कशी करता येईल यासाठी मी केंद्राला प्रस्ताव देखील दिला आहे, असंही पवार यांनी यावेळी सांगितलं. कोरोनाने शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची पुनर्रचना झाली आहे. हफ्ते लांबवले पाहिजेत. व्याजदरात सूट दिली पाहिजे, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“शून्य संख्येनंतरच लॉकडाऊन उघडला जाईल हा विचार अशक्य”

-ऋषी कपूर यांच्या अखेरच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी उडवली होती टीकेची झोड; पाहा काय होतं ‘ते’ ट्विट

-ऋषी कपूर यांचं जाणं माझ्यासाठी अत्यंत दुख:द- अक्षय कुमार

-तो गेलाय आणि मी उध्वस्त झालोय… महानायक अमिताभ बच्चन यांची आदरांजली

-अभिनेते ऋषी कपूर यांची मृत्यूशी झुंज अपयशी; मुंबईतल्या एच. एन. रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास