महेंद्रसिंग धोनीने सांसारिक मोह मायेपासून संन्यास घेतला? फोटो व्हायरल

मुंबई | जगभरातील क्रिकेटप्रेमी क्रिकेटच्या ज्या सत्रासाठी वेडे असतात. ते इंडियन प्रीमिअर लीग अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सध्या सर्वच खेळाडू आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील सध्या आयपीएलच्या सत्रासाठी सराव करत आहे.

मात्र, चेन्नई सुपर किंग्जच्या टीमचा कर्णधार असलेला धोनी सध्या आणखी एका कारणामुळे खूप जास्त चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो व्हायरल होत आहे. धोनीच्या व्हायरल होणाऱ्या या फोटोमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये धोनीने बौद्ध भिकुचा पोशाख परिधान केल्याचं दिसत आहे. हा फोटो पाहून नेटकरी अनेक सवाल उपस्थित करत आहेत. धोनीने सांसारिक मोह मायेपासून संन्यास तर घेतला नाही ना? असा सवाल नेटकरी उपस्थीत करत आहेत.

स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून धोनीचा बौद्ध भिकूच्या रूपातील हा फोटो शेअर करण्यात आला आहे. चाहते धोनीच्या या फोटोवर भरभरून लाईक ठोकत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये धोनीने टक्कल केल्याचं दिसत आहे. तसेच बौद्ध भिकुसारखे कपडे घालून तो एका जंगलात बसला आहे. हा फोटो नेमका कोणत्या कारणाने शेअर करण्यात आला आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

दरम्यान, धोनीने खरंच टक्कल केला आहे की मेकअप केला आहे, हे देखील अद्याप समजू शकलेलं नाही. हा फोटो एखाद्या जाहिरातीच्या शूट दरम्यानचा असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

….म्हणून या बड्या अभिनेत्रीने भर स्टेजवर कपडे काढले; कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; भाजपच्या ‘या’ नेत्यानं केली मागणी

…अन् शिल्पाने सेटवरच त्याच्या कानशिलात वाजवली; पाहा व्हिडिओ