मनोरंजन

…म्हणून आयएएस झालेल्या ऐश्वर्या श्योराण मॉडेलने केली पोलिसांत तक्रार!

नवी दिल्ली | युपीएससीच्या परीक्षेचा आत्ता नुकताच निकाल लागला. यामध्ये मिस इंडिया स्पर्धेत फाइनलिस्ट ठरलेल्या मॉडेल ऐश्वर्या श्योराणने 93 वा क्रमांक पटकावला. तिने मिळवलेल्या यशामुळे सध्या ती खुप चर्चेत आहे. मात्र एका कारणामुळे ती त्रस्त झाली आणि तिने अखेर यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आहे.

ऐश्वर्या श्योराणाचं सध्या देशभरात कौतूक केलं जात आहे. सोशल माध्यमांवर तरूण-तरूणीही तिला सर्च करून तिच्या विषयी माहिती जाणूनन घेत आहेत. मात्र काही समाजकंटकांनी ऐश्वर्या श्योराणाच्या प्रसिद्धीचा फायदा घेत तिच्या नावाने काही फेक अकाउंट उघडले आहेत.

इंन्स्टाग्रामवर तिच्या नावाने जवळजवळ 20 फेक अकांउंट उघडले असल्याची माहिती आहे. या फेक अकाउंटवर ऐश्वर्या श्योराणचे काही फोटोझ आणि व्हिडीओ सोडले आहेत. त्यामुळे नेटकरीही मोठ्या प्रमाणात त्या फेक अकाउंटला फॉलो करत आहेत. त्यामुेळे त्रस्त झालेल्या ऐश्वर्याने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, ऐश्वर्याने फेक अकाउंट्स विरोधात कुलाबा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सध्या सायबर पोलीस विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

प्रियंका गांधींच्या शिष्टाईमुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा; सचिन पायलटांचं बंड शमलं!

“विद्यार्थांना फी भरण्याची सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे, विद्यार्थ्यांकडून 50 टक्केच फी घ्यावी”

…तर सरकारला शॉक देऊ; वाढीव वीज बीलावरून राजू शेट्टी आक्रमक

DTH च्या ग्राहकांना मिळत आहे चार दिवस मोफत टीव्ही पाहण्याची संधी; कसं ते जाणून घ्या!

रणवीर रेपिस्ट तर दीपिका सायको आहे; कंगना रनौत पुन्हा भडकली