माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

मुंबई | भाजप खासदार आणि भाजप नेते, नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात निलेश राणे यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.

कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतलं असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, असं आवाहनही त्यांनी संपर्कात आलेल्यांना केलं आहे. राज्यात अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजपमध्ये गृहमंत्री अमित शहांपासून ते अनेक आमदार आणि खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, कालच सातारचे पालकमंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘कोरोनाकाळात आंदोलनं करताय तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत’; मुश्रीफ यांची विरोधकांवर खरमरीत टीका

‘जन्म झाला मुलाचा हातात सोपवली मुलगी’; पुण्यातील नामांकित रूग्णालयातील धक्कादायक प्रकार

“कानून के हाथ लंबे होते है, वादा किया है तो निभाना पडेगा’, जमत नसेल तर राजीनामा द्या”

‘सुशांतच्या घरी त्या रात्री महाराष्ट्रातील एक मंत्रीही उपस्थित होता’; नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

‘कधी राष्ट्रवादीच्या तर कधी भाजपच्या मांडीवर जाऊन बसतोस’; मनसेच्या अविनाश जाधवांवर शिवसेनेची टीका