उर्मिला मातोंडकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसला दुसरा धक्का; हा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई |  मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. विधानसभेच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का मानण्यात येत आहे.

दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंह यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं. त्याचवेळी सिंह यांच्या पक्षप्रवेशाविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे.

कृपाशंकर सिंह यांच्यावर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. कांदे आणि बटाटे विकून त्यांनी 300 कोटी जमा केल्याचा आरोप आहे.

कृपाशंकर सिंह यांची अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोपावरून चौकशीही सुरू होती. मात्र या प्रकरणातून ते सहीसलामत सुटले होते.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर सिंह यांच्यारूपाने मुंबई काँग्रेसला दुसरा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-