मनमोहन सिंह यांनी नरेंद्र मोदींना दिला ‘हा’ सल्ला; म्हणतात…

नवी दिल्ली : हेडलाईन मॅनेजमेंटमधून बाहेर येत अर्थव्यवस्थेची मंदी दूर करण्यासाठी सरकारने गांभीर्याने काम करावं, असा सल्ला माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहन सिंह यांनी नरेंद्र मोदींना दिला आहे.

मोदी सरकारने अर्थव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत चिंताग्रस्त आहे हे मान्य करावं आणि त्यानुसार उपाय करावेत. ही प्रत्येक क्षेत्रातील मंदी आहे, असंही मनमोहन सिंह म्हणाले. याशिवाय त्यांनी मंदीवर मात करण्यासाठी सहा उपायही सुचवले आहेत.

जीएसटीमध्ये सुलभता, शेतीचं पुनरुज्जीवन,भांडवल निर्मिती ,रोजगार केंद्रीत क्षेत्रावर भर, निर्यातीला प्रोत्साहन, पायाभूत सुविधा हे सहा उपाय मनमोहन सिंह यांनी मोदींना सुचवले आहेत.

भारत ही रोखीवर चालणारी अर्थव्यवस्था आहे. या देशातला मोठा वर्ग आजही रोखीचेच व्यवहार करतो, पण नोटाबंदीनंतर बाजारात अभूतपूर्व चलन तुटवडा निर्माण झाला, असं मनमोहन सिंह यांनी सांगितलं आहे.

भारत सध्या एका मोठ्या संकटाकडे ओढला जात आहे. प्रदीर्घ मंदी ही चक्रिय आणि रचनात्मक स्वरुपाची आहे. त्यामुळे भारतात मंदी नाही हे नाकारणं आपल्याला सध्या परवडणारं नाही, असंही मनमोहन सिंह म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-